लोकांना त्यांच्या लाईफ स्टाईलमुळे आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यात वजन वाढणे किंवा जाड होण्याच्या समस्या लोकांना भेडसावू लागले आहेत. अशात अनेक लोक आपलं वजन कमी करण्यासाठी हेल्दी जेवण किंवा जेवण कमी करण्याचा पर्याय निवडतात. परंतु यामध्ये लोकांना एक प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी भात कमी खावं की, चपाती? बरेच लोक वजन कमी करताना प्रथम चपाती खेणं सोडून देतात आणि नंतर काही तासांतच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या सुरू होतात. आता भारतीय अन्नाचा विचार केला, तर भात आणि चपाती हे दोन्ही मुख्य पदार्थ आहेत, जे कार्बोहायड्रेट देतात.
आता अशा परिस्थितीत दोन्हीपैकी एक सोडणे कठीण होऊ शकते. भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे चपातीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात. त्याच वेळी, मधुमेह असलेल्या लोकांनी काय करावं असा देखील लोकांना प्रश्न पडतो. तांदूळ आणि गहू ही दोन्ही तृणधान्ये आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण असते. ते किती असते ते जाणून घेऊया.
अहवालानुसार, १०० ग्रॅम गव्हाच्या पिठात७६ ग्रॅम कर्बोदक१० ग्रॅम प्रथिने१ ग्रॅम फॅट
अहवालानुसार, १०० ग्रॅम तांदळात२८ ग्रॅम कर्बोदक२.७ ग्रॅम प्रथिने०.३ ग्रॅम फॅट
अशा परिस्थितीत भात आणि चपाती यात फारसा फरक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर आपण दोन्हीची पोषक मूल्ये पाहिली तर फक्त सोडियममध्ये तुम्हाला मोठा फरक पडेल. तांदळात सोडियमचे प्रमाण कमी असते तर चपातीत ते जास्त असते.
वजन कमी करण्यासाठी काय चांगले?अनेक अहवाल आणि आहारतज्ज्ञांच्या मते, अनेकांना चपातीपेक्षा भातमुळे पोट जास्त भरलेलं वाटतं, अशा परिस्थितीत काही लोक भरपूर भात खातात. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. परंतु हे लक्षात घ्या की, अशा वेळी चपाती किंवा भात खणं चूकीचं नसून तुमची खाण्याची पद्धत चूकीची आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चपाती आणि भात दोन्ही आरोग्यदायी असतात. तुम्हाला फक्त भाग नियंत्रणाचा सराव करायचा आहे. पण जेव्हा आपण वजन कमी करण्याबद्दल बोलतो तेव्हा चपाती अधिक फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.
जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भात खायचा असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी, तर तुम्ही खिचडी बनवू शकता ज्यामध्ये डाळी किंवा भाज्यांचे प्रमाण जास्त असेल. मात्र, रात्री साधी चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेहासाठी काय चांगले आहे?मधुमेहाच्या रुग्णांमध्ये बेसनाच्या चपात्या सर्वोत्तम असतात, कारण दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. दुसरीकडे, जेव्हा भाताचा विचार केला जातो, तेव्हा ब्राऊन तांदळाचा जीआय कमी असतो, परंतु चपाती किंवा तांदूळ या दोन्हीपैकी कोणते हे विचारले तर जीआयच्या दृष्टीने चपाती अधिक चांगली आहे.