Weight Loss Tips : वाढलेलं वजन कमी करणं ही आजकाल एक मोठी समस्या झाली आहे. चुकीची लाइफस्टाईल, झोप कमी घेणे, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी या कारणांमुळे लोकांचं वजन कमी वयात आणि जास्त वाढत आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कुणी जिमला जातं तर कुणी योगा करतं. तसेच कुणी नियमित चालतात किंवा धावतात. इतकंच नाही तर बरेच लोक जेवणही बंद करतात. पण हे मार्ग खरंच फायदेशीर आहेत का किंवा याने फायदा होईल का याचा अभ्यास कुणी करत नाही. काहींना यश मिळतं आणि काही लोकांना नाही.
अशात अनेकांना प्रश्न पडू शकतो की, बरीच मेहनत करूनही वजन कमी का होत नाही? मुळात काही लोक वजन कमी करताना काही चुका करतात. त्या जर सतत करत राहिल्या तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. अशा लोकांसाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी वजन कमी करताना 3 चुका टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी इन्स्टाच्या एका पोस्टमधून या चुकांबाबत सांगितलं आहे. त्याच जाणून घेऊ.
1) कार्ब्सला घाबरू नका
वजन कमी करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना हीच भिती वाटत असते की, त्यांनी कार्ब्सचं सेवन केलं तर यामुळे वजन कमी होणार नाही. त्यामुळे बरेच लोक घरातील चपाती, भाजी, डाळभात आणि इतरही अनेक फूड्स खाणं टाळतात. रिसर्चमधून समोर आलं आहे की, गरजेनुसार कार्ब्सचं सेवन करणं गरजेचं आहे. कार्ब्सने केवळ एनर्जी मिळते असं नाही तर शरीराच्या इतर फायद्यांसाठीही महत्वाचे असतात.
2) एकसारखे पदार्थ खाणे
अनेकदा असं बघायला मिळतं की, लोक एकाच प्रकारचे फूड्स रोज किंवा दिवसातून अनेकदा खातात. हे फूड्स हेल्दी असले तरी ते खाणाऱ्या लोकांमध्ये एनोरेक्सिया नर्वोसा आणि बुलिमिया नर्वोसाची लक्षण दिसणं कॉमन आहे. अशात एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
3) एक्सरसाइजमध्ये सातत्य नसणे
वजन कमी करत असताना जास्तीत जास्त लोकांचं लक्ष या गोष्टींकडे असतं की, त्यांनी आज 1000 पावलं चालायची आहेत किंवा 1 तास एक्सरसाइज करायची आहे, कॅलरी किती बर्न करायच्या आहेत. पण हे चुकीचं आहे. एक्सरसाइजकडे तुम्ही जबरदस्ती किंवा शिक्षा म्हणून बघू नका. त्याकडे सामान्यपणे बघा आणि जीवनाचा एक भाग म्हणून बघा. तेव्हाच तुमचं वजन कमी होईल.