काही लोक आपल्या आरोग्याबाबत फार जागरूक असतात. त्यासाठी ते सकाळी उठून मॉर्निंग वॉकसाठी जातात. स्वतःच्या फिटनेससाठी ते वॉकिंग, जॉगिंग किंवा रनिंगचा आधार घेतात. परंतु, असं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे याचा अभ्यास करता. तुम्हाला जरी रनिंग आवडत असेल, तर त्यासाठी योग्य पद्धत जाणून घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य प्रकारे धावला नाहीत तर त्यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी तुम्हाला विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे धावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...
वॉर्मअप न करणं
धावण्यास सुरूवात करण्याआधी तुम्हाला थोडसं वॉर्मअप करणं गरजेचं असतं. फक्त धावणचं नाही तर, कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. धावण्याआधी वॉर्मअप गरजेचं आहे. कारण धावणं वेगाने करण्यात येणाऱ्या कार्डिओप्रमाणे आहे. वॉर्मअप केल्याने तुमचे पाय, हिप्स आणि बट्स मजबुत होतात. तुम्हाला पळताना मदत मिळते. तसेच तुम्हाला कोणतीही इजा होत नाही. त्यामुळे रनिंग करण्याआधी वॉर्मअप म्हणून स्ट्रेचेज आणि लंजेस करा.
क्षमतेपेक्षा वेगाने धावणं
टॉक टेस्ट म्हणजे हे पाहणं की, तुम्ही धावताना बोलू शकता की, नाही. जर तुम्ही बोलू शकत नसाल तर त्याचा अर्थ होतो की, तुम्ही फार वेगाने धावत आहात. त्यामुळे तुम्ही जास्त वेगाने धावणं शक्यतो टाळलं पाहिजे. असं केल्याने तुम्हाला इजा पोहोचू शकते.
योग्य आहार न घेणं
अनेकदा वर्कआउट केल्यानंतर भूक लागत नाही. पण अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की, मसल्सद्वारे पोषक तत्वांना अब्जॉर्ब करण्याची क्षमता वर्कआउट करण्याच्या 45 मिनिटांच्या आतमध्ये अधिक असते. त्यामुळे रनिंगनंतर काहीना काही नक्की खा. तुमच्या आहारामध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असणं गरजेचं असतं. त्यामुळे मसल्स रिपेअर होण्यास मदत होते.
जास्त धावणं
जर तुम्ही जास्त धावत असाल किंवा जास्त वेगाने धावत असाल तर तुम्हाला इजा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही जर अंतर वाढवण्याचा विचार करत असाल तर हळूहळू वाढवा
चुकीचे शूज वापरणं
बऱ्याचदा असं दिसून येतं की, अनेकांना चुकीचे रनिंग शूज वापरल्यामुळे इजा होते. त्यामुळे रनिंग शूज नक्की घ्या. काही वेळाने शूज बदलणं गरजेचं असतं. कारण शूजमध्ये असलेले कुशन खराब होतात. त्यानंतरही शूज वापरल्याने इजा होऊ शकते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.