जेवणात चव आणणारं मीठ फक्त याच कामासाठी वापरलं जात असं नाही. मीठाचे तुम्हाला माहित नसलेले इतरही फायदे आहेत. जेवणात वापरल्या जाणाऱ्या मीठाचा (Salt) वापर करुन तुम्ही त्वचेच्या समस्याही सोडवू शकतात. घ्या जाणून अधिक...
टोनरप्रमाणे करा मीठाचा वापर
तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मीठ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी काय कराल तर, एका स्प्रे बाटलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर मीठ घाला. हे पाणी तुम्ही कापसाच्या मदतीनं आपल्या चेहऱ्याला लावू शकतात. हे एक उत्तम टोनर आहे.
स्क्रब म्हणून करा मीठाचा वापर
उन्हामुळे तुमची स्किन टॅन झाली आहे का? स्कीन वरील टॅन म्हणजेच काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही एक चमचा नारळाच्या तेलामध्ये मीठ मिक्स करुन हे मिश्रण स्क्रबप्रमाणे (Scrub) आपल्या त्वचेला लावू शकता.
मीठापासून तयार करा फेस मास्क
मीठाचा फेस मास्क तयार करण्यासाठी तीन चमचे मध (Honey) आणि एक चमचा मीठ घ्या. त्याचे व्यवस्थित मिश्रण तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. १०मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
अंघोळीच्या पाण्यात मीठ घाला
हल्ली कोरड्या त्वचेमुळे (Dry Skin) अनेक जण त्रस्त असतात. अशा लोकांनी अंघोळीच्या पाण्यात मीठाचा वापर करावा. यासाठी एक कप बादलीमध्ये अर्धा कप मीठ घाला. तुम्ही बाथटपमध्ये देखील मीठ घालू करु शकता आणि त्यामध्ये तुम्ही १५ मिनिटं बसा. बघा कसा कोरड्या त्वचेला तजेला मिळतो ते.