Salted Fruits Side Effects : फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबट-गोड फळं टेस्टलाही फार चांगले असतात. लोकांना वेगवेगळी फळं खाण्याची आवड असते. कुणी मीठ टाकून तर कुणी ज्यूस तयार करून फळांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करतात. फळांचे छोटे तुकडे करून त्यावर मीठ टाकलं जातं. पण असं करणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
हाय सोडिअम
फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढू शकतं. अशाप्रकारे मीठ टाकून खाल्ल्याने शरीरात मिठाचं प्रमाण वाढतं. आणि जास्त सोडिअम झालं की, ब्लड प्रेशर आणि हार्टसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
किडनीमध्ये समस्या
मीठ जास्त खाणं किडनीसाठी अजिबात चांगलं नाहीये. जास्त मीठ खाल्ल्याने किडनीमध्ये समस्या होऊ लागते. बरेच लोक किडनीमध्ये समस्या झाल्यावर काही फळांचं सेवन करतात. जर यावर मीठ टाकून खाल्लं तर स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. किडनी डिजीज झाल्यावर मीठ खाण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे.
ब्लोटिंगची समस्या
सोडिअम शरीरात जास्त झालं तर शरीरात वॉटर रिटेंशन होण्याचा धोका राहतो. यामुळे पोटात ब्लोटिंगची समस्या होऊ लागते. जास्त सोडिअम झाल्याने बॉडी डिटॉक्स होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.
न्यूट्रिएंट्सची कमतरता
फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने फळांमधील पोषक तत्व पूर्णपणे शरीराला मिळू शकत नाहीत. मीठ टाकल्यावर फळांमधील पाणी बाहेर येतं आणि काही पोषणही कमी होतात. मीठ जास्त खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांचं शोषणही योग्यपणे होत नाही.