शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे डायपर तुम्ही कचऱ्यात फेकता? हा व्हीडीओ पहा, स्वत:ची लाजच वाटेल!

By admin | Published: May 08, 2017 3:21 PM

सॅनिटरी नॅपकिन, मुलांचे डायपर्स डस्टबिनमध्ये आणि उघड्यावर फेकण्यापूर्वीविचारा स्वत:ला की, कुणी हे सारं आपल्या घरात फेकलं तर?

- अनन्या भारद्वाजत्या चार दिवसांविषयी तसंही अजून आपल्याकडे उघड बोलायची चोरीच आहे. अगदी सॅनिटरी नॅपकिन विकत घ्यायचं तरी लोकांच्या नजरा चुकवत जाणाऱ्या आणि तिथं जावून ते हळूच मागणाऱ्या अनेकजणी आपल्या आसपास आहेत. आपणही त्यातल्याच एक. सॅनिटरी नॅपकिन्सचं पाकिट विकत घेतलं की दुकानदार ते व्यवस्थित बांधून देणार आणि मग आपण हळूच एखाद्या पिशवीत घालून ते घरी आणणार. कुणाच्या नजरेस पडू नये असं ठेवणार. ते स्वच्छ नॅपकिन सुद्धा आपण असं मारे जपून वापरतो.आणि त्याचं काम झाल्यावर मात्र कसंबसं कागदात गुंडाळून किंवा काहीजणीत तर तसंच डस्टबिनमध्ये टाकून देतात. रस्त्यावरच्या उघड्या कचऱ्याकुंड्यात फेकतात. आणि ते फेकण्यात काहीही लाज वाटणं तर दूरच पण आपण चुकतोय असंही वाटत नाही. असं का? कचरा वर्गीकरण करणाऱ्या माणसांच्या आरोग्याचा, त्यांना येणाऱ्या वासाचा, किळस येण्याचा आपण काही विचार करतो का? तर नाहीच! हा एवढा बेफिकीरपणा आपल्यात कुठून येतो? सार्वजनिक आरोग्याविषयी आपण एवढ्या का उदासीन असतो?जे सॅनिटरी नॅपकिनचं तेच मुलांच्या डायपरचं. शी-शूने गच्चं भरलेले डायपरही असेच कचऱ्यात टाकले जातात. उघड्यावर फेकले जातात.काहीजणी तर हे नॅपकिन किंवा डायपर सुद्धा शौचालयात फ्लश करतात. ( करू नका, डस्टबिनमध्ये टाका असं लिहिलेलं असूनही हे सर्रास होतं.)यासंदर्भातच प्रश्न विचारणारा हा व्हिडीओ.तो म्हणतो तुमच्या आॅफिसच्या ड्रॉवरमध्ये किंवा घरात कुणी असा कचरा टाकला तर तुम्हाला चालेल का?मग तुम्ही तो बाहेर कसा टाकता?कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा किती त्रास होतो.त्यापेक्षा हे नॅपकिन्स किंवा डायपर एखाद्या कागदात व्यवस्थित गुंडाळा. त्याची तोंड बंद करा. आणि मग त्यावर एक मोठ्ठं लाल रंगाचं भरीव वर्तुळ करा. आणि फक्त सुक्या कचऱ्यात टाका. म्हणजे कचरा विगतीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळेल की हा सॅनिटरी कचरा आहे. तो न उघडता त्याची विल्हेवाट लावता येवू शकेल.ही सारी माहिती स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था लिमिटेड या स्वयंसेवी संघटनेच्या फेसबुकपेजवर पाहता येवू शकते. ‘स्वच्छ’नेच तयार केलेला आणि आपल्या फेसबुकवर पेज प्रसारीत केलेला हा व्हीडीओ, शुद्ध मराठीत अत्यंत नेमकी माहिती देतो. आपण स्वत: तर हा व्हीडीओ पहावाच, पण आपल्या मैत्रणींनाही दाखवावा, यासंदर्भात जनजागृती ही आपल्या भल्याची आणि सामाजिक स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे..हा व्हीडीओ नक्की पहा..