Sattu powder benefits : सत्तू पावडरचं उत्तर भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर सेवन केलं जातं. याने पोट थंड राहतं. सातूचे पीठ करण्यासाठी गहू / जव आणि हरबऱ्याची डाळ खरपूस भाजतात व मग त्यात सुंठ, जिरे आणि विलायची टाकतात. हे मिश्रण दळून आणतात. तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात.
हे पावडर किंवा याचं पाणी एनर्जीचं पावरहाऊस मानलं जातं. याला गरीबांचं प्रोटीनही म्हणतात. हा सगळ्यात स्वस्त आणि चांगला सोर्स शरीरला प्रोटीन मिळवून देण्यासाठी. सोबतच सत्तूमध्ये आयर्न, सोडिअम, फायबर आणि मॅग्नीशियमही भरपूर असतं.
जर हे पावडर पाण्यात मिक्स केलं आणि त्यात थोडं मीठ टाकून त्यात लिंबाचा रस टाकला आणि रिकाम्या पोटी याचं सेवन केलं तर याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतात.
सत्तूचे फायदे
- सकाळी रिकाम्या पोटी सत्तूचं सेवन करणं फार फायदेशीर मानलं जातं. याने पचन तंत्र ठीक करण्यास मदत मिळते. सत्तूमध्ये आढळणारं मीठ, आयर्न आणि फायबर पोटासंबंधी समस्या कमी करतं आणि मलत्याग करण्यास मदत मिळते.
- सत्तूमध्ये असे गुण असतात जे दिवसभर पोट थंड ठेवतात आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. रोज एक ग्लास सत्तूचं सरबत तुमचं सिस्टीम थंड ठेवतं आणि अपचनही रोखतं.
- जर तुम्हाला तुमचं वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर रिकाम्या पोटी सत्तूचं सेवन करणं सुरू करा. याने शरीरातील सूजही कमी होते आणि पचनही व्यवस्थित राहतं. तसेच याने कॅलरीही नष्ट होतात.
- वैज्ञानिकांनुसार, याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते. फायबर भरपूर असलेल्या सत्तूने हाय कोलेस्ट्रॉलने हैराण असणाऱ्या लोकांना मदत मिळू शकते.