तुम्ही फास्ट फुड, तेलकट पदार्थ खात असाल. या पदार्थांद्वारे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणावर जमत असेल. या कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल. यातील गुड कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरासाठी चांगले असते. तर बॅड कोलेस्ट्रॉल अत्यंत वाईट. तुम्ही काय खाता यावर तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल आहे की गुड कोलेस्ट्रॉल हे ठरतं.
हावर्ड डॉट इडीयूमध्ये प्रकाशित झालेल्या रिर्सच रिपोर्टनुसार तुम्ही जास्तीत जास्त गुड फॅटचे सेवन केले पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच मोनोअनसॅच्युरेटेड व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे सेवन करणे टाळले पाहिजे कारण यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. भाज्यांपासून बनवलेले तेल, मक्याचे तेल, सुर्यफुलाचे तेल आदीमध्ये गुड फॅट असते जे शरीरासाठी चांगले असते.
तर बटर, चीज, नारळाचे तेल, कोकोनट क्रीम, मेयोनीज, आईस्क्रीम यामध्ये सैच्युरेटेड फॅट असते ते शरीरासाठी अत्यंत घातक असते. हे असे फॅट धमन्यांमध्ये साचून बसते त्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक, कार्डियाक अरेस्ट यासारखे आजार होतात. कारण या अशा फॅटच्या सेवनाने तुमच्या शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढु शकते.
त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे भाज्या, मक्याचे तेल, सुर्यफुलाचे तेल आदींपासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही आणि गंभीर आजारांचा धोका टळेल.