आजकालची जीवनशैली ही निव्वळ बसून काम करण्याची झाली आहे. तासनतास ऑफिसमध्ये बसून काम केल्याने कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे यांसारख्या समस्या उद्भवतात. चुकीच्या पद्धतीने झोपणे, सततचे ड्रायव्हिंग यामुळे दुखणे अजुनच वाढते. ज्या लोकांमध्ये न्युट्रियंट्स आणि व्हिटॅमिनची कमतरता असते त्यांना या समस्येचा जास्त त्रास होतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यामुळे कंबर, पाठदुखी जाणवते. व्हिटॅमिन बी १२ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. ज्यांच्यामध्ये याची कमतरता असते ते लवकर थकतात. त्यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे पोषक आहार.
वरील दुखणे तुम्हालाही होऊ नयं असे वाटत असेल तर डाएटमध्ये काही गोष्टी समाविष्ट करणे गरजेचे आहे.
हळदीचे दूध
कोरोना च्या काळात प्रत्येक घरातील व्यक्ती हळदीचे दूध आवर्जुन घेत होती. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध किती फायदेशीर आहे हे आपल्याला समजले. हळदीचे दूध स्नायुंच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. कंबरदुखी, पाठदुखी दूर करण्यासाठी रात्री झोपताना हळदीचे दूध प्यावे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद घालून ते प्या खूप फरक पडेल.
हर्बल टी
पाठदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनी दुधाच्या चहाची सवय कमी करुन हर्बल टी घ्यायला हरकत नाही.हर्बल टी चे ही फायदे आयु्र्वेदात सांगितले आहेत. ग्रीन टी बनवून त्यात आल्याचे तुकडे घाला आणि उकळु द्या. या चहात अॅंटीइंफ्लामेटरी प्रॉपर्टीज भरपुर प्रमाणात असतात. हर्बल टी प्यायल्याने प्रसन्नही वाटते.
दुग्धजन्य पदार्थ
दूध,दही,ताक,लोणी हे पदार्थ शरीरासाठी खुपच आरोग्यदायी आहेत. यातुन व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण होते. मात्र हे पदार्थ खाताना काळजीही घेतली पाहिजे. वेळी अवेळी, अतिप्रमाणात याचे सेवन करु नये.
अंडी, मासे
जे नॉनव्हेज खातात त्यांनी अंडी आणि मासे खाण्यास हरकत नाही. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. व्हिटॅमिन्स ची कमतरता दूर होते.