पुरुष आणि स्त्रीयांच्या शरीरात अनेक बाबतीत वेगळेपण असते. मात्र पुरुषांच्या शरीरामध्ये स्तन का असतात? पुरुष मुलांना स्तनपान करत नाहीत, मात्र तरीही त्यांच्या शरीरावर निपल्स का असतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे विज्ञानामधील एक रंजक कारण आहे. त्याबाबत अमेरिकेमध्ये सखोल संशोधन करण्यात आले आहे. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या पॅलियो एंथ्रोपॉलॉजिस्ट इयान टेटरसन यांनी सांगितले की, गर्भामध्ये नर आणि मादी दोघांच्याही भ्रूणाच्या विकासाची सुरुवात एकाच जेनेटिक ब्ल्यूप्रिंटपासून होते. त्यामध्ये कुठलाही फरक असत नाही.
लाइव्ह सायन्समध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार भ्रूणाचा विकास नर किंवा मादी कुठल्या रूपात होईल, याची सुरुवात ही आपण Pubertyच्या स्तरावर पोहोचतो तेव्हा सुरू होते. पुरुषांमध्ये स्तन एक Vestigial Organ च्या रूपात असते. याचा अर्थ हा की त्याचा काही उपयोग नसतो. गर्भावस्थेच्या ६-७ आठवड्यांनंतर भ्रूणामध्ये Y गुणसूत्राचा विकास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पुरुषांचे शरीर तयार होण्यास सुरुवात होते. सर्वप्रथम Testes विकसित होतात. या अवयवामध्ये स्पर्म स्टोअर होतात.
त्याशिवाय टेस्टोस्टेरॉनमुळे हार्मोन तयार होतात. हे हार्मोन्स भ्रूणाच्या विकासादरम्यान ९ आठवड्यांमध्ये स्रवित होण्यास सुरू होतात. त्यामुळेच बाळाच्या जेनेटिकमद्ये बदल सुरू होतो. शरीरातील इतर अवयवही अशाच प्रकारे विकसित होतात.
पॅलियो एँथ्रोपोलॉजिस्ट इयान टेटरसेल यांनी सांगितले की, पुरुषांमध्ये स्तन असणे हे कुठल्या मेटबॉलिक क्रियेशी संबंधित नाही आहे. पुरुषांना या अवयवाची आवश्यकता नसते. भ्रूणाच्या विकासादरम्यान, हे पुरुषांच्या शरीरामध्ये येतात. मात्र याला काही महत्त्व नसते. जर ते पुरुषांच्या शरीरात नसले तरी काही फरक पडणार नाही.
इयान टेटरसेल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषांच्या शरीरामध्ये अनेक असे अवयव असतात. ज्यांचं शरीरामध्ये काहीही काम नसते. यामध्ये अपेंडिक्स, स्तन, ह्युमन टेलबोर्न आणि विस्डम टीथ यांचंही काही काम नसते.