जाडेपणामुळे हैराण झालेल्या लोकांसाठी एका आनंदाची बातमी आहे. कारण अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मेडिसन यूनिर्व्हसिटीच्या संशोधकांनी एक असं डिवाइस तयार केलंय ज्याद्वारे जाडेपणावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. सर्जरीच्या मदतीने हे डिवाइस पोटाशी जोडलं जाईल आणि फार कमी तीव्रतेचा करंट रिलीज करेल. जेव्हा व्यक्ती जेवण करणार तेव्हा हे डिवाइस अॅक्टिव होईल आणि मेंदूला संदेश पाठवणाऱ्या प्रकियेला उत्तेजीत करेल. नर्वच्या मदतीने मेंदू संदेश पाठवेल की, व्यक्तीला भूक लागलेली नाही. अशाप्रकारे हे डिवाइस काम करेल. संशोधकांनी दावा केला आहे की, याच्या मदतीने १५ दिवसात ३८ टक्के वजन कमी केलं जाऊ शकतं. सध्या या डिवाइसला कोणतही नाव देण्यात आलेलं नाही.
डिवाइससंबंधी चार मुख्य बाबी
पोटाच्या हालचालीने मेंदूला जातो संदेश
संशोधकांना हा शोध उंदरांवर केला आहे. ज्यातून समोर आलेल्या गोष्टी जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. संशोधकांच्या गटाचे मुख्य डॉ. शूडॉन्ग वॅंग म्हणाले की, डिवाइसने योग्यप्रकारे काम करावं यासाठी हृदयाच्या ठोक्यांना आधार बनवलं आहे. जेवण करताना पोटाच्या काम करण्याच्या गतीनेच हृदयाचे ठोके वाढतात आणि संदेश मेंदूला पाठवला जातो.
१५ दिवसात कमी झालं वजन
संशोधकांनी सांगितलं की, डिवाइसमध्ये लावण्यात आलेलं इलेक्ट्रिक नॅनो जनरेटरच मेंदूशी निगडीत नर्वला उत्तेजित करतं. संशोधकांनी सर्जरीच्या मदतीने डिवाइसला पोटात इम्प्लांट केलं. डिवाइस एका सोन्याच्या प्लेटसोबत जोडलं गेलं आहे. शोधात २५० ग्रॅमच्या एका उंदीराचा समावेश करण्यात आला होता आणि ९३ दिवसांपर्यंत त्याच्या आहारावर लक्ष ठेवण्यात आलं. १५ दिवसांनी त्याच्या आहारात दोन तृतियांश कमतरता आली. १८ दिवसांच्या आताच वजनात ३५ टक्के कमतरता आली होती.
नव्या डिवाइसमध्ये बॅटरीची समस्या नाही
सध्या मेस्ट्रो नावाचं एक डिवाइस वजन कमी करण्यासाठी वापरलं जात आहे. याला २०१५ मध्ये फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने मंजूरी दिली होती. पण यातील सर्वात मोठी समस्या ही बॅटरी आहे. जी अनेकदा बदलली जाते. संशोधकांनुसार, नव्या डिवाइसमध्ये इलेक्ट्रोड आहे. जे स्वत: वीज निर्माण करतं. पोटात होणाऱ्या हालचालीनेच बॅटरी चार्ज होऊ लागते. साधारण एका तासांच्या हालचालीनंतर बॅटरी एका आठवडा पॉवर सप्लाय करु शकते.
लवकर केला जाईल मनुष्यावर वापर
विस्कॉन्सिन एल्यूमिनी रिसर्च फाऊंडेशनच्या मदतीने या डिवाइसचं पेटेंट करण्यात आलं आहे. संशोधकांना विश्वास आहे की, लवकरच मनुष्याआधी या डिवाइसचा प्रयोग मोठ्या प्राण्यांवर केला जाणार आहे. संशोधकांनी या डिवाइसमध्ये कुठेही ऑन किंवा ऑफ करण्याची सुविधा दिली नाही. मात्र, अशाप्रकारे जेवणाआधीच मेंदू पोट भरलं असल्याचा संकेत देईल, तर आरोग्याला या धोका होऊ शकतो. पण याबाबत संशोधकांनी काहीही स्पष्ट केलं नाहीये.
सध्या या डिवाइसची चाचणी सुरु आहे. पुढे सगळंकाही ठिक झालं आणि रिझल्ट चांगले आले तर याचा फार वापर वाढू शकतो. कारण जगभरातील लोकांनी वाढत्या वजनाने हैराण केलं आहे. वजन कमी करण्यासाठी ते भरमसाठ पैसाही खर्च करतात. अशात हे डिवाइस आलं तर अनेकजण याचा फायदा नक्कीच करुन घेतील.