अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावर चालता चालता एखाद्या व्यक्तीला फिट्स येते आणि तो खाली पडतो. यात तो व्यक्ती हात-पाय आखडून घेतो. त्यांच्या तोंडातून फेस आणि लाळही येऊ लागते. या आजाराला मिरगी येणे, फीट येणे असे म्हटले जाते. ही फार गंभीर समस्या असून याने जीवालाही धोका असतो. या गंभीर आजारावर उपचार शोधण्यासाठी नुकताच टेक्सास एग्रीकल्चरल अॅन्ड मेकॅनिकल यूनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च करण्यात आला. आता हा आजारा स्टेम सेल्सच्या(पेशी) मदतीने बरा केला जाऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
संशोधकांनी सांगितले की, रुग्णाच्या त्वचेतून स्टेम सेल्स(पेशी) तयार केल्या जातील आणि त्या त्याच्या मेंदूत टाकल्या जातील. कन्व्हर्ट करण्यात आलेल्या स्टेम सेल्स फिट्स येणे रोखणे आणि याचा प्रभाव कमी करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आल्या आहेत. उंदरांवर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले की, स्टेम सेल्स प्रत्यारोपित केल्यानंतर ७० टक्के फिट्सचे झटके येणे कमी झाले. ब्रिटनमध्ये १०० पैकी १ व्यक्तीला आणि अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या १.२ टक्के लोकांना मिरगी किंवा फीट येण्याची समस्या आहे.
का येते फीट?
फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. ज्या प्रकारे शॉर्ट सर्किटमध्ये दोन तारांमध्ये वीज चुकीच्या दिशेने प्रवाहीत होते. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. १ दिवसांच्या बाळापासून ते १०० वर्षांच्या वयोवृद्धालाही फिट्स येण्याची समस्या होऊ शकते. WHO नुसार, जगभरात ५ कोटी लोकांना फीट येण्याची समस्या आहे.
नव्या पेशी वाढण्यावर फोकस
मेंदूमध्ये छोट्या छोट्या ब्रेन सेल्समध्ये इलेक्ट्रीक प्रक्रिया होत असतात. यातील काही पेशी दुसऱ्या पेशींना उत्तेजित करतात. अशा स्थितीत इनहिबिटर पेशी रोखल्या जातात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने संतुलन बिघडतं आणि फिट्स येण्याचा धोका वाढतो. संशोधकांनी फिट्स येणे रोखण्यासाठी या पेशी वाढवण्यावर प्रयत्न केलाय.
नव्या उपायाने ७० टक्के धोका कमी
फिट्स येणे रोखण्यासाठी सर्वातआधी उंदरांच्या शरीरात क्लोजापाइन-एन-ऑक्साइड रसायन इंजेक्ट केलं. संशोधकांनी त्वचेपासून तयार करण्यात आलेल्या स्टेम पेशींचं उंदरांच्या मेंदूमध्ये प्रत्यारोपण केलं. ५ महिन्यांनी असे आढळले की, दुसऱ्या उंदरांच्या तुलनेत या उंदरांमध्ये फीट येण्याचा धोका ७० टक्के कमी झाला.
संशोधकांनुसार, ज्या रुग्णाना फिट्स येण्याची समस्या हिप्पोकॅंपस(मेंदूच्या मध्यात असलेला भाग) पासून होते, त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरु शकतो. हिप्पोकॅंपसचा संबंध व्यक्तीच्या स्मरणशक्ती आणि भावनांशी असतो. या शोधात हिप्पोकॅपसमध्ये प्रत्यारोपण केलेल्या पेशी यशस्वी ठरल्या. रिसर्चचे लेखक डॉ. अशोक शेट्टी यांच्यनुसार, या उपचारामध्ये ट्रान्सप्लांटेशननंतर तयार होणारे न्यूरॉन शांत राहतात. याला कीमोजेनेटिक प्रक्रिया म्हटले जाते.
मनुष्यांवर प्रयोग होणार
भविष्यात फिट्स येणे रोखण्यासाठी एंटी-एप्लेटिक औषधे दिली जाऊ शकतात. गंभीर स्थितीमध्ये सर्जरी सुद्धा केली जाऊ शकते. ज्यात हिप्पोकॅंपसचा प्रभावित भाग काढला जातो. यात ७० ते ८० टक्के यश मिळतं. संशोधकांचं म्हणणं आहे की, सर्जरीमध्ये हिप्पोकॅंपसला नुकसान होऊ शकतं आणि याचा प्रभाव स्मरणशक्तीवरही पडू शकतो. अशात या नव्या पद्धतीचा वापर करुन उपचार केला जाऊ शकतो. ही पद्धत मनुष्यावर किती प्रभावी ठरेल याचा प्रयोग करुन पाहणे बाकी आहे.