शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

नवनवीन रुपं घेणारा हा कोरोना व्हायरस नेमका बदलतो कसा? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 6:10 PM

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, व्हायरस स्वतःमध्ये कसा बदल करतो आणि हे नवीन व्हेरिएंट कसे दिसतात.

यावेळी, जगासाठी कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रोन व्हेरिएंट, चिंतेचं कारण बनलं आहे. याआधीही कोरोनाचे काही धोकादायक व्हेरिएंट समोर आले आहेत. व्हायरसमध्ये होत असलेल्या बदलांमुळे हे घडतंय आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, व्हायरस स्वतःमध्ये कसा बदल करतो आणि हे नवीन व्हेरिएंट कसे दिसतात.

ऑल इंडिया सेंटर ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीच्या क्रिटिकल केअर विभागाचे युधवीर सिंग यांनी सांगितलं की, जेव्हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो तेव्हा त्याची गुणाकार करण्याची क्षमता सुधारते.

व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढते. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांच्यामध्ये विषाणू वाढू लागतो आणि स्वतःला मजबूत बनवतो आणि त्याचे मूळ स्वरूप बदलतो. मग हा नवा फॉर्म मुख्य विषाणू बनतो आणि इतर लोकांमध्ये पसरू लागतो. जीनोम सिक्वेन्सिंग दाखवतं की, व्हायरसने स्वतःमध्ये बदल केला आहे आणि तो नवीन प्रकारांमध्ये बदलला आहे.

व्हायरस असा बदललाडॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा वुहानमधून उद्भवलेल्या SARS-Cov 2 नंतर D614 झाला. त्यानंतर या व्हेरिएंटमध्ये बरेच बदल झाले. ज्यांना अल्फा, डेल्टा, बीटा, गामा, लॅम्बडा, एमयू अशी नावं देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेत, व्हायरसने त्याचं स्वरूप बदललं, ज्याला ओमायक्रोन असं नाव देण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सर्व प्रकारांची दोन प्रकारे व्याख्या केली आहे. त्यांना 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' आणि 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्‍ट' असं म्हणतात. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉन यांना 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' मध्ये ठेवलं आहे. त्याच वेळी, Lambda आणि MU सारख्या प्रकारांना 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्‍ट' म्हटलं गेलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन