प्लास्टिकचे छोटे कण आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. त्यामुळे काचेच्या किंवा धातूच्या बाटल्यांमधून पाणी किंवा इतर पेये पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. दरम्यान, लहान प्लास्टिकच्या कणांमुळे ह्यूमन टिशूजला धोका आहे, असा इशारा रोम टोर वर्गाटा विद्यापीठातील हिस्टोलॉजी आणि भ्रूणविज्ञान या विषयातील तज्ज्ञ डॉ. लुईसा कॅम्पानोलो यांनी दिला आहे.
यापूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, प्लास्टिकचे सूक्ष्म कण मानवी रक्तप्रवाहात आणि नाभीमध्येही प्रवेश करू शकतात. पण, अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत उंदरांवरील एका नव्या अभ्यासाची माहिती देण्यात आली. या संशोधनानुसार प्लास्टिकचे छोटे कण गर्भवती महिलांचे (Pregnant Women) भ्रूण नष्ट करू शकतात.
डॉ. लुईसा यांच्या मते, भ्रूण हे प्लास्टिकच्या कणांचे लक्ष्य असू शकते, असे संकेत मिळाले आहेत. मायक्रोप्लास्टिक्स व्यासमध्ये हे 0.2 इंच म्हणजेच 5 मिमी पेक्षा कमी प्लास्टिकचे छोटे तुकडे असतात. याशिवाय, प्लास्टिकचे काही सूक्ष्म कण इतके लहान असतात की, ते डोळ्यांनी पाहता येत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, विल्हेवाट लावलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आपल्या डेब्रिसला सोडू शकतात, विशेषत: जेव्हा प्लास्टिक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असते. दरम्यान, डॉ. लुईसा सांगतात की, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी न पिणे आपल्या आरोग्यासाठीही चांगले राहील.
संशोधनात काय आले समोर?न्यू जर्सी येथील रटगर्स विद्यापीठातील पर्यावरण आणि नॅनोसायन्स बायोइंजिनियरिंगचे तज्ज्ञ डॉ.फिलीप यांच्या मते, प्राण्यांवर केलेले हे संशोधन खरोखरच चिंताजनक आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या एका संशोधनानुसार, 24 तासांनंतर गर्भवती प्राण्याच्या नाभीमध्ये सूक्ष्म- आणि नॅनो-प्लास्टिक आढळले. एवढेच नाही तर भ्रूणच्या प्रत्येक भागात हे प्लास्टिकचे कण आढळून आले. तसेच, प्रत्येक व्यक्ती दर आठवड्याला सुमारे 5 ग्रॅम सूक्ष्म आणि नॅनो-प्लास्टिक वापरते, जे चिंताजनक आहे, असेही डॉ. फिलिप यांनी सांगितले.