भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस. विराट आपली फिटनेस, एक्सरसाइज आणि जिमबाबत नेहमी कॉन्शिअस असल्याचे पाहायला मिळते. पण विराटबाबतची एक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. कोणती? हिच की, विराटचं खाण्यावर प्रचंड प्रेम असून तो फुडी आहे. नवभारत टाइम्ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी विराटने वेगन डाएट फॉलो करण्यास सुरुवात केली असून त्याने आपल्या आवडीचे मांसाहारी पदार्थ आणि डेअरी प्रोडक्ट्स खाणं सोडून दिलं आहे. तो फूडी असला तरिही नेहमी हेल्दी पदार्थ खाण्यावर भर देतो. आज आपण जाणून घेऊया आपली फिटनेस मेन्टेन करण्यासाठी विराट नक्की कोणतं सीक्रेट डाएट फॉलो करतो त्याबाबत...
ब्रेकफास्टमध्ये फ्रुट्स आणि ग्रीन टी
विराट कोहली आपल्या दिवसाची सुरुवात फ्रेश फ्रुट्ससोबत करतो. त्याला पपई, ड्रॅगन फ्रुट किंवा टरबूज फार आवडतात. याव्यतिरिक्त त्याला ग्रीन टी देखील आवडते. दिवसभरात तो जवळपास 3 ते 4 कप ग्रीन टी पितो.
नट्स आणि ब्लॅक कॉफीवर प्रचंड प्रेम
विराटच्या मते, आपला स्ट्रेस दूर करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपी पद्धत म्हणजे, ब्लॅक कॉफी आणि नट्स. स्नॅक्स म्हणून तुम्ही नट्स आणि ब्लॅक कॉफीचं सेवन करू शकता. यामुळे कॅलरी इन्टेकही लो असतं आणि नेहमी हेल्दी राहण्यासही मदत होते.
दिवसभर मैदानार खेळल्यानंतर किंवा प्रॅक्टिसनंतर विराट रात्रीच्या जेवणात ज्या पदार्थांचा समावेश करतो, ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असण्यासोबतच हलके असतात. यामुळेच विराट डिनरमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ जसं, सलाड, सूप किंवा थोडे फ्राय पदार्थांचा समावेश करतो.
हेल्दी फॅट्स नेहमी असतात सोबत
तसं पाहायला गेलं तर अनेक लोक फॅट्सना फिटनेसचं दुश्मन समजतात. परंतु, शरीरासाठी हेल्दी फॅट्स अत्यंत आवश्यक असतात. कदाचित यामुळेच विराट आपल्या डाएटमध्ये हेल्दी फॅट्सचा समावेश करतो. तो जेव्हाही ट्रॅव्हल करतो त्यावेळी नट्स आणि बटर आपल्यासोबत ठेवतो.
बॉटल्ड वॉटर आवडते
आपल्या पिण्याच्या पाण्याबाबत विराट नेहमी सतर्क असतो आणि कदाचित यामुळेच तो जेव्हा ट्रॅव्हल करतो. त्यावेळी नेहमी पॅकेज्ड मिनरल वॉटर पिणं पसंत करतो. जे खासकरून फ्रान्सवरून इंमोर्ट केलं जातं.