शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

तज्ज्ञांनी शोधलं नेहमी तरूण दिसण्यामागचं रहस्य; मानवी शरीरात दडलाय 'हा' फॉर्मूला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:23 PM

ऑस्टियोकॅल्सिन हाडांमधील जुने टिश्यू काढून नवीन टिश्यूज तयार करतो. याच हार्मोनमुळे आपली उंची वाढते.

नेहमी तरूण दिसण्यासाठी शरीरातील हाडांची मोठी भूमिका असते. हाडांमध्ये जर विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्सचं संतुलन व्यवस्थित असेल तर वयाआधीच म्हातारं दिसण्याापासून वाचता येऊ शकतं. तज्ज्ञांनी या गोष्टींबाबत माहिती मिळवली आहे की, म्हतारपण लवकर येऊ न देणं हे आपल्या हाडांवर अवलंबून असतं. हाडांमधील एका हार्मोनमुळे व्यक्ती नेहमी तरूण दिसू शकते.

कोलंबिया यूनिवर्सिटीतील जेनेनिक विभागाचे प्राध्यापक गेरार्ड कारसेंटी हे ३० वर्षांपासून हाडांमध्ये लपलेल्या या सिक्रेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हाडांमध्ये जमा होत असलेल्या ऑस्टियोकॅल्सिन Osteocalcine Hormone वर संशोधन केले होते. त्यात असं दिसून आलं की, ऑस्टियोकॅल्सिन हाडांमधील जुने टिश्यू काढून नवीन टिश्यूज तयार करतो. याच हार्मोनमुळे आपली उंची वाढते. हाडांवरंच आपले संपूर्ण शरीर उभे असते. गेरार्ड यांनी उंदरांवर या हार्मोन्सचे जीन काढून प्रयोग केले होते.

हाडांमुळे शरीरातील वेगवेगळ्या क्रिया प्रभावित होतात. हाडांमध्ये असलेले टिश्यू हार्मोन्सचं संतुलन टिकवून ठेवतात.  हाडांमध्ये हार्मोन्स तयार होऊन संपूर्ण शरीरात पसरत असते. त्यामुळेच आपण व्यायाम किंवा कोणतीही क्रिया करू शकतो. व्यायाम केल्याने वाढत्या वयाच्या शरीरावरील खुणांना रोखता येऊ शकतं. त्यामुळे स्मरणशक्तीही चांगली राहते.

प्रो. गेरार्ड कारसेंटी यांनी सांगितले की. जर तुम्हाला लवकर म्हातारं व्हायचं नसेल तर शरीरातील ऑस्टियोकॅल्सिन वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. नियमित व्यायाम केल्याने शरीरात ऑस्टियोकॅल्सिन जास्तीत जास्त तयार होते. तज्ज्ञांकडून ऑस्टियोकॅल्सिन वाढवण्याची औषध तयार करण्यावर प्रयोग सुरू आहेत. 

जेणेकरून म्हातारपणातील समस्या कमी होऊ शकतील.  युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रक्तातील प्लाज्माचा काही भाग काढून त्यात सलाईन किंवा एल्बयुमिनचा प्रयोग केल्यास वाढत्या वयाच्या प्रक्रियेला उलट करता येऊ शकते.  पण या संशोधनानुसार दररोज न चुकता व्यायाम केल्याने वाढत्या वयाच्या समस्यांपासून लांब राहता येऊ शकतं. 

लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा

धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स