एकदा का तुम्ही चाळीशीचे झालात की शरीर अनेक आजारांना आमंत्रण देऊ लागते. त्यात सध्या वर्कफ्रॉम होम चालु असल्याने अनेकांना शरीराचे नवीन त्रास सुरु झाले आहेत. त्यामुळे चाळीशी नंतर फिटनेसची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. ही काळजी फक्त स्त्रियांनीच घेणं गरजेच नाही तर पुरुषांनीही घेतली पाहिजे. बरेचदा स्त्रियांच्या फिटनेसबद्दल फार कमी बोललं व लिहिलं जात. त्यामुळे पुरुष मंडळींनो आम्ही तुम्हाला देत आहोत अशा टीप्स ज्या तुम्हाला चाळीशीनंतरही फिट राहायला मदत करतील.
स्वत: ला हायड्रेट ठेवाकोणत्याही ऋतूत विशेषत: उन्हाळ्यात तुम्ही शरीराली सतत हायड्रेट ठेवलं पाहिजे. म्हणून पाणी पित रहा. तज्ज्ञांच्या मते तुमच्या शरीरात दिवसभरात किमान ३ लीटर पाणी तरी गेलं पाहिजे. पाणी शरीराला डिटॉक्स करायला मदत करत त्यामुळे पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्ही नारळपाणी, ग्रीन टी याचेही सेवन करू शकता.
भरपूर फायबरयुक्त भाज्या, फळे खाआपल्या शरीराला फायबरची अत्यंत गरज असते. चयापचय व्यवस्थित करण्यासाठी फायबर आवश्यक आहे. स्प्राऊट्स, हिरव्या पालेभाज्या, अक्रोड अशा गोष्टींचा आहारात जास्तीतजास्त समावेश करा. यामुळे कॉलेस्ट्रॉलही कमी होईल आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहील.
गुड फॅट खाअवकाडो, ऑलीव्ह ऑईल, नट्स अशा गुड फॅटवाल्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
ओट्स खाओट्स, दलिया, ब्राऊन राईस या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. तुम्हाला एनर्जीटीक वाटू लागते. यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते जे तुमच्या आरोग्यासाठी भरपूर आवश्यक असते.
प्रोटीनयुक्त आहार घ्याजेवणात प्लांट बेस्ड प्रोटीन घ्या, जसे टोफू, सोयामिल्क, सुका मेवा. फक्त हे खाताना वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्या.
या गोष्टींपासून दूर राहातेलकट. मसालेदार पदार्थ, मद्यपान, सिगरेट यापासून दूर रहा. यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. तसेच फास्ट फूड, पॅकेज फुडही खाणे टाळा.