जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी भारतीय कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोना लसीच्या दिशेनं मोठी पाऊलं उचलताना दिसून येत आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेतील कंपनी कोडाजेनिक्ससह लस तयार करण्याचा करार केला होता. ही लस तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही लस नाकाद्वारे दिली जाते. कोडाजेनिक्सकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या लसीचे नाव CDX-005 आहे. या लसीच्या चाचणीसाठी प्राण्यांवर प्री क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले होते. या वर्षाच्या शेवटापर्यंत UK मध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार प्री क्लिनिकल अभ्यासात या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
कोडाजेनिक्सचे सीईओ जे रॉबर्ट कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सिरम इंन्स्टिट्यूटची टेक्निक आणि आर्थिक मदत पाहता या वर्षीच्या शेवटापर्यंत लसीच्या वैद्यकिय चाचण्या पूर्ण होतील अशी आशा आम्हाला आहे. तसंच लसीवर वेगानं काम सुरू होऊ शकतं. ही लस तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. व्हायरसचं म्यूटेशन पाहता SARS-CoV-2 जीनोम्सना रिकोड करतो. या लसीमुळे रोगाशी लढण्याची क्षमता नसतानाही शरीरात मजबूत टी सेल्स आणि एंटीबॉडी तयार करता येतात.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''इतर लसींपेक्षा ही लस खूपच वेगळी आहे. सध्या जी लस तयार केली जात आहे ती एडीनोव्हायरसवर आधारित आहे. त्यामुळे स्पाईक प्रोटिन्सना टार्गेट करता येऊ शकतं. CDX-005 ही लस इंजेक्शनच्याऐवजी नाकाद्वारे दिली जाणार आहे. ही लस रुग्णांसाठी परिणामकारक आणि सुरक्षित ठरेल.'' सिरम इन्स्टिट्यूटला ही लस तयार करण्यासाठी भारताच्या (DBT) कडून मंजूरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया एक्स्ट्रा जेनेका कंपनीच्या सहयोगाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना लसींच्या चाचण्यांवर काम करत आहेत.
लस तयार होण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो?
पहिला टप्पा : रिसर्च अँड डेव्हलपमेंट
या प्रक्रियमध्ये दोन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनावरील लसीच्या या प्रक्रियेत जलद काम सुरु आहे. यामागील कारण असे आहे की, चीन सरकारला जानेवारीत विषाणूचा जेनेटिक सिक्वेंस आढळला होता. त्यावेळी कोरोना विषाणू फक्त चीनमध्ये होता. जास्तकरून लस ही विषाणूच्या प्रोटीनऐवजी त्यांच्या जेनेटिक स्विक्वेंसच्या आधावर असते.
दुसरा टप्पा : प्री-क्लिनिकल
रिसर्च आणि डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर, या लसीची चाचणी प्राणी आणि झाडांवर केली जाते. यामध्ये त्यांची क्षमता आणि कामकाज यांचे विश्लेषण केले जाते. यावेळी लस दिल्यानंतर प्राणी आणि झाडांची प्रतिकार शक्ती वाढते की नाही, हे संशोधक पाहणी करतात. जर लसीचा प्रभाव झाला नाही, तर पुन्हा लसीची चाचणी पहिल्या टप्प्यावर जाते, त्यामुळे प्रक्रिया पुन्हा लांबते.
तिसरा टप्पा : क्लिनिकल ट्रायल
लस तयार करण्याचा हा सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा असतो. कारण, लसीच्या क्षमतेची चाचणी मानवावर केली जाते. या टप्प्यात 90 महिन्यांपर्यंत किंवा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी घेण्याची क्षमता ठेवली आहे. या टप्प्यात सुद्धा आणखी तीन टप्पे असतात. यात बरेच असे उमेदवार आहेत, जे दुसऱ्या टप्प्यात यशस्वी होतात. परंतु तिसऱ्या टप्प्यात अपयशी ठरतात. 1) या लसीचा उपयोग लोकांच्या लहान समुहावर केला जातो आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत की नाही याची तपासणी केली जाते. याला सुमारे तीन महिने लागू शकतात.2) ज्या लोकांना लस द्यावयाची आहे, त्यांची संख्या हजारोपर्यंत वाढविली जाते. यासाठी सरासरी 6 ते 8 महिने लागू शकतात. यामध्ये रोगाची प्रतिकारशक्ती (इम्यून रिस्पॉन्स) विकसित झाली की नाही हे पाहिले जाते. यावेळी लसीच्या सामान्य आणि उलट प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या क्षमतेचे देखील विश्लेषण केले जाते. कोरोना विषाणूच्या बाबतीत हा टप्पा छोटा करण्यात आला आहे, कारण काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे बरेच उमेदवार आता क्लिनिकल ट्रायल टप्प्यात पोहोचले आहेत.3) हजारो लोकांवर लसीचे मूल्यांकन केले जाते आणि जास्त लोकांमध्ये ही लस कशी कार्य करते, हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पुन्हा 6 ते 8 महिने लागू शकतात.
चौथा टप्पा : रेग्युलेटरी रिव्यू (नियामक पुनरावलोकन)
मानवी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वी झाल्यानंतर लस निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जाण्यापूर्वी नियामक समर्थनाची आवश्यकता असते. सामान्यत: याला बराच वेळ लागतो, परंतु अशा सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत, कालावधी कमी केला जाऊ शकतो.
पाचवा टप्पा : मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी कंट्रोल (उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण)
या टप्प्यात, लस तयार करणार्या कंपनीला चांगल्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक संसाधनांची आवश्यकता असते, जेणेकरुन लस तयार करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू केली जाऊ शकेल.
रोगावर मात करण्यासाठी लसच का?
लस हे एक प्रकारचे औषध आहे, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि विषाणूशी लढायला मदत करते. रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा एक मार्ग म्हणजे लस. कोणताही रोग टाळण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे. ही लस रोगप्रतिकारक यंत्रणेस उत्तेजित करते व अँटिबॉडीज तयार करते. बहुतेक लस इंजेक्शनद्वारे दिल्या जातात, परंतु काही तोंडी किंवा नाकाद्वारे देखील दिली जातात. आतापर्यंत पोलिओ, टिटॅनस, डिप्थीरिया, मेनिंजायटीस, इन्फ्लूएन्झा, टाइफाइड अशा 25 हून अधिक जीवघेण्या रोगांपासून वाचविण्यासाठी लस दिली जाते.
हे पण वाचा-
'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान
दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...
पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय
भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग
तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय