जगातील सर्वात मोठी लस निर्माता एक्स्ट्राजेनेका ही कंपनी कोरोना लसीच्या डोजचे उत्पादन वाढवत आहे. भारतभर सुरू होणार्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी डिसेंबरपर्यंत १०० दशलक्ष डोस तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. शेवटच्या चाचणीतील टप्प्यात एक्स्ट्राजेनकाने तयार केलेल्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले तर, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून सुरूवातीला १ कोटी लसीच्या डोसचे उत्पादन केलं जाणार आहे. डिसेंबरपर्यंत या लसीच्या आपातकालीन स्थितीतील वापरासाठी मंजूरी मिळू शकते. अशी शक्यता आदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे.
सुरूवातीला ही लस भारतातील लोकांना दिली जाईल पूनावाला यांनी गुरुवारी एका मुलाखतीत सांगितले की, ''पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने गरीब राष्ट्रांसाठी लसी वितरित करणारी योजना कोवॅक्सच्या अंतर्गत ५० -५० त्या तत्वांवर आधारित लस वितरण करण्यासाठी परवानगी मिळू शकते. पाच कंपन्यांसोबत करारबद्ध असलेल्या सिरमने गेल्या दोन महिन्यांत एक्स्ट्राजेनकाच्या लसीचे आतापर्यंत 40 दशलक्ष डोस तयार केले आहेत. लवकरच नोव्हावॅक्स इंक कंपनीच्या लसीचे उत्पादन तयार करण्याचे उद्दीष्ट आहे.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''आम्हाला थोडी चिंता होती की हा एक मोठा धोका पत्करण्यासारखेच आहे. पण आता एक्स्ट्राजेनका आणि नोव्हावॅक्सचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभराला आशेचा किरण दिसला आहे. लसीची किंमत आणि उत्पादनात येणारे अडथळे यांमुळे संपूर्ण जगभरातील लोकांना लस मिळण्यासाठी २०२४ पर्यंत वेळ लागू शकतो. संक्रमणाचा वेग कमी झाल्यास जवळपास २ वर्षात जगभरातील लोकांना लस मिळू शकते. असुरक्षित आणि फ्रंटलाईनवर काम करत असलेल्या कामगारांना प्रारंभिक लस देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.''
एक्स्ट्राजेनका चे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट यांनी सांगितले आहे की, ''डिसेंबरच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेने आपातकालीन परवाना दिल्यानंतर सीरम हाच डेटा भारतीय भागांकडे जमा करेल.'' दरम्यान सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पुनावाला यांनी मागच्या आढवड्यात सांगितले होते की, ''एक सुरक्षित आणि प्रभावी लस पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला उपलब्ध होईल. चाचणी यशस्वी ठरली आणि रेग्यूलेटरी अप्रुव्हल मिळाले तर जानेवारीमध्येच लस तयार होऊ शकते. भारतात फेज 2/3 चाचणीअंतर्गत हजारो लोकांना कोविशील्डही लस दिली जाणार आहे.
कोरोनाच्या माहामारीने वाढला 'या' घातक आजाराचा धोका; २३ वर्षांनी रेकॉर्ड तोडला
सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीचे दीर्घकालीन परिणाम दिसण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. कोविशिल्ड लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी याासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लस ही स्वस्त दरात उपलब्ध होईल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ''
आनंदाची बातमी! रशियन कंपनीची स्पुटनिक -व्ही कोरोना लस ९२ टक्के ठरली प्रभावी