- मयूर पठाडेडोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवा, नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊ नका.. कायम चांगल्याच बाजूकडे बघा.. म्हणायला हे ठीक आहे, पण बºयाचदा परिस्थितीच अशी असते की नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात ठाण मांडतातच.काहीही केलं, तरी हे निगेटिव्ह विचार तुमची पाठ सोडत नाहीत आणि मग आपोआप आपण त्यात गुरफटले जातो.. सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडायला लागतात.असं होऊ द्यायचं नसेल, नकारात्मक गोष्टींना आपल्यापासून दूर ढकलायचं असेल तर काय करायचं?सोप्पं आहे, पण थोडे प्रयत्न मात्र करावे लागतील. केवळ सल्ला यासाठी उपयोगी ठरणार नाही, कृतीही करावी लागेल.कसे घालवाल नकारात्मक विचार?१- आपल्या विचारांत आपल्या बॉडी लॅँग्वेजचा, देहबोलीचा फार मोठा हातभार असतो. तुम्ही मरगळलेल्या स्थितीत असाल, चेहºयावर उत्साह नसेल, तर आपोआपच आपली मानसिकताही तशीच होते. त्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या बॉडी लॅँग्वेजकडे बघा. ताठ बसा. उत्साही असण्याचा प्रयत्न करा. बघा, नकारात्मक विचार बाजूला जातात की नाही ते!२- बºयाचदा आपल्या मनात अनेक गोष्टी साचलेल्या असतात. या साचलेपणामुळेही आपले विचार नकारात्मक होतात. या गोष्टी कोणाकडे तरी बोला. काढून टाका ती जळमटं, बोळे. बघा, तुम्ही फ्रेश व्हालच.३- बºयाचदा प्रत्येक गोष्टीची आपल्याला इतकी घाई झालेली असते, की कोणत्याच गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नसतो. मनही त्यामुळे त्याच वेगानं धावत असतं आणि त्याला पकडणं तर सर्वस्वी आयुष्य. यासाठी केवळ एक मिनिट द्या. शांत बसा. मनाला जागेवर आणण्याचा प्रयत्न करा. वेगळीच अनुभुती तुम्हाला येईल.४- कायम निगेटिव्ह विचारांनी तुमचं मन घेरलं असेल तर जरा पॉझिटिव्ह विचारांना त्यात जागा द्या.५- काहीतरी क्रिएटिव्ह करा. अगदी काहीही. चित्र काढण्यापासून तर मुलांशी गप्पा मारण्यापर्यंत, स्वयंपाकघरात लुडबुड करण्यापर्यंत काहीही..६- आपल्या कामातून ब्रेक घ्या आणि फिरायला जा. बाहेरच्या जगाकडे, निसर्गाकडे आवर्जुन बघा, लक्ष द्या..७- अनेकदा आपण किरकिरे झालेलो असतो. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीत काहीतरी खोड काढत असतो. त्याला नावं ठेवत असतो. बसा एकदा निवांतपणे. घ्या कागद-पेन आणि लिहून काढा आपल्या आजूबाजूला दिसणाºया पॉझिटिव्ह गोष्टी. आपल्या माणसांच्या चांगल्या गोष्टी.. तुमच्या लक्षात येईल, अरे, आपण उगाच किरकिर करतोय..
हल्ली तुमच्यातला किरकिरेपणा जरा जास्तच वाढलाय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:55 PM
मनातल्या नकारात्मक गोष्टींची जळमटं काढून टाकण्यासाठी या गोष्टी करुन तर पाहा..
ठळक मुद्दे आपली बॉडी लॅँग्वेज बदला.मनातली मळमळ, खदखद कोणाकडे तरी व्यक्त करा.काहीतरी क्रिएटिव्ह करा. मुलांशी खेळण्यापासून ते चित्र काढण्यापर्यंत, काहीही..बसा एकदा निवांतपणे. घ्या कागद-पेन आणि लिहून काढा आपल्या आजूबाजूच्या पॉझिटिव्ह गोष्टी.