शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

गंभीर स्वरूपाचा कोविड ओळखता येणार! पालिकेसह ICMR चा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:47 AM

उपचार पद्धतीतील बारकावे जाणून घेणे सोपे होईल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महासाथीनंतर अजूनही वैश्विक पातळीवर या आजाराविषयी संशोधन सुरू आहे. परिणामी, या माध्यमातून विषाणू व संसर्गाविषयी तीव्रता, उपचारपद्धतींविषयी अधिक सखोलपणे तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. पालिका इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाईल्ड हेल्थ या दोन संस्थांच्या मदतीने करत असलेल्या अभ्यासातून लवकरच गंभीर स्वरूपाचा कोविड ओळखणे सोपे होणार आहे.

दोन्ही संस्थाकडून होणाऱ्या या संशोधन अभ्यासातील अपेक्षित निष्कर्षाला बायोमार्कर ही संज्ञा आहे. २०२० पासून कोविडच्या उपचारपद्धतीविषयी संशोधन सुरू आहे. याविषयी, व्हायरल इम्युनोपॅथोजेनेसिस लॅब विभागाचे प्रमुख वैनव पटेल यांनी सांगितले, अनेकदा कोरोना संसर्गाची तीव्रता समजणे कठीण होते. काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाही, मात्र आजार गंभीर स्वरूपाचा असतो. तर काहींना कोरोनासह अन्य विषाणूचीही बाधा झालेली असते. त्यामुळे या अभ्यासातून कोरोनाची तीव्रता आणि नेमके आजाराचे स्वरूप समजण्यास मदत होणार आहे. लवकरच अभ्यासाच्या पहिल्याचे टप्प्याचे निरीक्षण प्रकाशित होईल, हा अभ्यास ल्युकोसाइट बायोलॉजीच्या प्रीव्हिह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाला.

  • या अभ्यासाच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या उपचार पद्धतीतील बारकावे जाणून घेणे सोपे होईल. तसेच, उपचारपद्धतीत करावयाचे बदलही समजून येतील. 
  • त्यामुळे लवकरच कोविड रुग्णांच्या नमुन्यांवर व्यापक पद्धतीने हा अभ्यास करून पूर्ण होईल. 
  • या अभ्यासाचे सादरीकरण पालिकेच्या आरोग्य विभागातील तज्ज्ञांसाठीही करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई