SEX THERAPY : लैंगिक समस्यांना दूर करेल ‘सेक्स थेरपी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 3:20 PM
‘सेक्स थेरपी’ माहित आहे का? ही थेरपी म्हणजे सेक्स पॉवर वाढविणारे एखादे औषध किंवा एखादा योगा असेल, असे जर आपणास वाटत असेल तर, तुम्ही चुकत आहात.
बहुतेक शारीरिक दुखण्यावर एका विशिष्ट थेरपीच्या साह्याने उपचार केला जातो. त्यानुसार आपण अनेक थेरपीबाबत ऐकलेही असेल. मात्र आपणास ‘सेक्स थेरपी’ माहित आहे का? ही थेरपी म्हणजे सेक्स पॉवर वाढविणारे एखादे औषध किंवा एखादा योगा असेल, असे जर आपणास वाटत असेल तर, तुम्ही चुकत आहात. एका संशोधनानूसार या थेरपीने आपणास शारीरिक सुख तर मिळेलच शिवाय आंतरीक सुखही वाढेल. ही थेरपी म्हणजे एका विशिष्ट प्रकारचे काऊन्सिलींग आहे, म्हणजेच मार्गदर्शन. या सेक्स थेरपीबद्दल ‘बेटर सेक्स गाईड टु एक्सट्राआॅर्डिनपी लवमेकींग’ या पुस्तकाचे लेखक यावोन के. फुलब्राईट यांनी अधिक सविस्तर सांगितले आहे. ते म्हणतात, सेक्स आणि रिलेशनशीप यांच्यामधील संबंधांना समजून घेण्यासाठी काही प्रयोग केले जातात. हे प्रयोग मनोविश्लेशनाच्या पातळीवर असतात. या प्रयोगांनाच सेक्स थेरपी म्हणतात. ही थेरपी घेतल्यावर व्यक्ती अगदी आनंदी आणि ट्रेंडी बनतात. शिवाय जर एखाद्या व्यक्ती त्याच्या लैंगिक जीवनात जर, एकटा असेल किंवा त्याला काही अडचणी असतील तर, या सर्व गोष्टींना सेक्स थेरपीच्या माध्यमातून दूर केले जाते. त्यासाठी सेक्स थेरपीस्ट संबंधीत व्यक्तीला गृहपाठही देतात. विशेष म्हणजे या थेरपीमध्ये शरीरावरील कोणत्याच भागातील कपडे उतरवावे लागत नाहीत. त्यामुळे तुम्हीही या थेरपीबाबत विचार करू शकता. तुमच्या नात्यात जर पुर्वीप्रमाणे ओलावा राहिला नसेल तर, ही थेरपी तुमच्या कामी येऊ शकते. या थेरपीच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा आपले प्रेम परत मिळवू शकता. इतकेच नव्हे तर, तुमच्या मनाचा विकासही करू शकता. Also Read : SEX KNOWLEDGE : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती ! : SEX LIFE : हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !