SEXUAL HEALTH : ‘कंडोम’वापरल्यानेही होऊ शकते अॅलर्जी !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 6:31 AM
सेक्सशी संबंधीत होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी ‘कंडोम’ हा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक उपाय आहे. मात्र आपल्या शरीरानेच ‘कंडोम’ला जर नाकारले तर काय होईल? हो, हे खरे आहे की, बऱ्याच पुरुष आणि महिलांना कंडोमपासून अॅलर्जी होऊ शकते.
सेक्सशी संबंधीत होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी ‘कंडोम’ हा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक उपाय आहे. मात्र आपल्या शरीरानेच ‘कंडोम’ला जर नाकारले तर काय होईल? हो, हे खरे आहे की, बऱ्याच पुरुष आणि महिलांना कंडोमपासून अॅलर्जी होऊ शकते. कंडोमचा वापर केल्यानंतर जर आपल्या प्रायव्हेट पार्टच्या भोवताली खाज किंवा रॅशेज होत असतील तर समजून घ्यावे की आपणास कंडोमपासून अॅलर्जी आहे. याशिवायही कंडोम अॅलर्जीशी जुडलेले बरेच फॅक्ट्स पाहावयास मिळतात. बऱ्याच लोकांना कंडोम ज्या घटकांपासून बनविण्यात येतो त्या घटकांची अॅलर्जी होते. जर आपणास अॅलर्जीची समस्या असेल तर सर्वप्रथम हे पाहा की, नेमक्या कोणत्या घटकांनी बनलेला कंडोम आपण वापरत आहात. कदाचित दुसऱ्या घटकांनी बनलेल्या कंडोमचा वापर केल्याने आपणास त्रास होणार नाही. बऱ्याचदा रॅशेज पडल्याने त्याजागी जळजळदेखील होते आणि तेथील त्वचा लाल होते. अशावेळी तिथे कदापी स्पर्श करु नका किंवा खाजू नका कारण त्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आपण या समस्येकडे दुर्लक्ष केले तर आजार गंभीर होऊन डोकेदु:खी, ह्रदयाचे ठोके वाढणे, श्वासाच्या तक्रारी आणि ओठ सुजण्यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावा.