SEXUAL HEALTH : एका इंजेक्शनने मिळेल कंडोम आणि नसबंदीपासून सुटका !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 8:50 AM
जेव्हाही आपण पुरुषांसाठी गर्भनिरोधकच्या बाबतीत चर्चा करतो, तेव्हा मनात फक्त दोनच विचार येतात, ते म्हणजे कंडोम आणि नसबंदी.
जेव्हाही आपण पुरुषांसाठी गर्भनिरोधकच्या बाबतीत चर्चा करतो, तेव्हा मनात फक्त दोनच विचार येतात, ते म्हणजे कंडोम आणि नसबंदी. मात्र आता एका नव्या संशोधनानूसार या यादीत एका नव्या नावाचा समावेश झाला आहे. वेसलजेल एक नवे उत्पादन आहे जे इंजेक्टेबल जेल आहे जे शरीरामध्ये स्पर्मला ब्लॉक करते. हे प्रोडक्ट रीसम बंदरावर उपयुक्त ठरले आहे. हे संशोधन ओपन एक्सेस जर्नल बेसिक अॅण्ड क्लिनिकल एंड्रॉलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे. हे गर्भनिरोधक जेल शरीरातून स्पर्मला बाहेर पडण्यास प्रतिबंध करते, म्हणून हे वेसल जेल गर्भनिरोधकसाठी अति परिणामकारक आहे. या जेल मध्ये जे गुण आहेत ते मनुष्यासाठी बनविण्यात आलेल्या गर्भनिरोधकासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. संशोधकाच्या मते या लसीकरणाचे मनुष्यांवरील परिक्षण लवकरच सुरु करण्यात येईल.