SEXUAL HEALTH : किस करण्याचे आहेत अनेक फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 7:23 AM
किस केल्याने पचन क्रिया सुरळीत होऊन जीवन काळात वृद्धी होते. किस केल्याचे अजून बरेच फायदे आहेत, त्याबाबत जाणून घेऊया.
दोन प्रेमी, पती-पत्नी किंवा अन्य आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना किस करतात. याने भावनात्मक जुडाव साधला तर जातो शिवाय मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी अनेक फायदे होतात असे एका संशोधनाने स्पष्ट झाले आहे. किस केल्याने पचन क्रिया सुरळीत होऊन जीवन काळात वृद्धी होते. किस केल्याचे अजून बरेच फायदे आहेत, त्याबाबत जाणून घेऊया. चेहऱ्याचे सौंदर्य खुलते चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम आवश्यक असतो. किस केल्याने चेहºयाच्या ३० स्रायुंचा व्यायाम होतो, ज्याने गाल टाइट होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. कॅलरी होतात कमीएक रोमँटिक किस केल्याने २ ते ३ कॅलरीज तर भावनिक किस केल्याने ५ पेक्षा जास्त कॅलरीज कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किस घेताना जेवढा जास्त वेळ लावाल तेवढ्या कॅलरीज बर्न होतील. इतर शारीरिक क्रियाकलापांमुळे ज्या प्रकारे कॅलरीज कमी होतात अगदी त्याच प्रकारे.आराम मिळतोकिस केल्याने शरीरात फील-गुड के मिकल्सची निर्मिती होत असल्याने शरीरात ओक्सीटोसिन जे नैसर्गिक आरामदायक केमिकल आहे, याची पातळी वाढते. याने रिलॅक्स आणि आनंदाची अनुभूती होते.रोग प्रतिकारशक्ती वाढतेकिस केल्याने दोघांच्या शरीरात रासायनिक बदल होऊन त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. याने शरीर मजबूत होऊन आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.हार्माेन्सची देवाण-घेवाणकिसिंगमुळे पुरूषांचे हार्मोन्स महिलेच्या तोंडात जाते, ज्यामुळे टेस्टोस्टेरोन सारख्या हार्माेन्सचा संचार होतो. अशात महिलेत उत्तेजना वाढते आणि परिणामस्वरूप सेक्सची संधी सापडते. वाद संपतोदोघांमधील वाद संपविण्यासाठी एक भावनिक किस महत्त्वाची भूमिका बजाविते. दोघांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप याने सहज मिटतात. Also Read : प्रेमात ‘किस’ करण्याअगोदर थोडी मस्ती गरजेची !