SEXUAL HEALTH : ही आहेत ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 8:16 AM
या गोष्टींचा परिणाम आपल्या ‘बेडरूम’मध्ये होऊन चांगले परफॉर्म करु न शकल्याने निराशा पदरी पडते. आपले सेक्शुअल लाइफ असंतुष्ट होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत जाणून घेऊया.
-Ravindra Moreआज प्रत्येकाचे आयुष्य एवढे धावपळीचे झाले आहे. या धावपळीमुळे आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण सहज हातातून निसटून जातात. शिवाय आपल्या पार्टनरकडेही आपले दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम आपल्या ‘बेडरूम’मध्ये होऊन चांगले परफॉर्म करु न शकल्याने निराशा पदरी पडते. मग आपले सेक्शुअल लाइफ असंतुष्ट होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत जाणून घेऊया.* स्पर्धेची जाणिवदिवसेंदिवस स्पर्धा वाढत असून या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण व करिअरमध्ये असलेली अती महत्वाकांक्षा पुरुषांना बेचैन करते. सगळ्यांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत ते एवढे व्यस्त होतात की याचा परिणाम थेट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. * संतुलित आहाराचा अभावबदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांना संतुलित आहारापासून वंचित राहावे लागते, यामुळे त्यांची शारिरीक शक्ती कमी होऊन सेक्शुअल लाइफ डिस्टर्ब होते. * व्यसनांची सवयबहुतांश पुरुषांना धूम्रपान, मद्यपान करण्याची सवय असते. याचा परिणाम थेट शरीरावर होऊन स्मर्प काऊंट कमी होतो. या कारणाने त्याला बेडरुममध्ये परफॉर्म टिकविता येत नाही. * ताण-तणावताण-तणावाने व्यक्तीची शारीरिक, मानसिकशक्ती नष्ट होते, व्यक्ती दुर्बळ होतो. याकारणाने तो कोणतीच गोष्ट मनापासून करु शकत नाही, याचाच परिणाम त्यांच्या आनंदावर होतो.* कामाचा व्यापकामात चांगले परफॉर्म दाखविण्यासाठी किंवा लवकर यश मिळविण्यासाठी बहुतेकजण कामाचा व्याप स्वत:हून वाढवून घेतात. आठ तासांऐवजी अधिक वेळ काम करतात. यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नाही. * गॅझेट्सचा परिणाम आज प्रत्येकजण फावल्या वेळेत आपल्याजवळील मोबाइल, टीव्ही आदी उपकरांमध्ये व्यस्त झाला आहे. याचा परिणाम दोघांमधील संवाद कमी होऊन जवळीकता साधली जात नाही. * सतत पॉर्नसंबंधी गोष्टींमध्ये व्यस्तजो व्यक्ती सतत पॉर्नसंबंधी गोष्टींमध्ये व्यस्त असतो, म्हणजेच नेहमी एक्स रिलेटेड फिल्म पाहतो, अशा व्यक्तीचे मन नेहमी वासनेचाच विचार करते. याचा वाईट परिणाम थेट त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊन तो आपल्या जोडीदाराच्या सहवासाने नेहमी असंतुष्ट राहतो.