राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे (Shard Pawar Symptomatic Gallstones) थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली.
पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे. (Sharad Pawar NCP chief hospitalized in Mumbai Know What is Endoscopy) 31 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून एण्डोस्कोपीनंतर त्यांच्यावर आवश्यक त्या सर्जरी करण्यात येतील.
एण्डोस्कोपी केव्हा करावी लागते?
विशिष्ट आजाराचे निदान करण्यासाठी
काही उपचारांसाठी
शस्त्रक्रियेसाठी (Endoscopic वा Laproscopic सर्जरीसाठी)
एण्डोस्कोपी काय असते?
एण्डोस्कोपी पोटात लहानसे छिद्र करुन त्यातून दुर्बिण (एण्डोस्कोपी) आत टाकली जाते. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड (CO2) या वायूने रुग्णांचे पोट फुगवले जाते. त्यानंतर पोटाच्या आतील भागाचे निरिक्षण केले जाते. समस्या नेमकी काय आहे ते कळल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास नाभी व्यतिरिक्त दोन-तीन ठिकाणी छिद्र तयार करून उपकरणं पोटात सोडली जातात आणि शस्त्रक्रिया केली जाते.
एण्डोस्कोपीचा फायदा
एण्डोस्कोपी पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये २ ते ३ छिद्रांमधून ऑपरेशन करण्यात येतं. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात. पोटावर शस्त्रक्रियेचा डाग राहत नसून रुग्णाला दवाखान्यात कमी दिवस राहावं लागतं. रुग्ण पुर्ववत आपल्या दैनंदिन कामाला लवकर रुजू होऊ शकतो.
सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या' ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार
एण्डोस्कोपीनंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात का?
एण्डोस्कोपीनंतर सहसा काही गुंतागुंत होत नाही, पण जर biopsy साठी तुकडा काढून घेतला असेल तर त्या जागेतून रक्तस्राव होऊ शकतो, जो काही वेळानंतर थांबतो. यासाठी काही औषधोपचाराची गरज नसते.