SHOCKING : कॅन्सरचा संबंध ‘सेक्स’शी ! जाणून घ्या कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 1:03 PM
जे लोक सेक्स करणे बंद करतात, त्यांच्यात प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. शिवाय जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांच्यात कॅन्सर होण्याची शक्यता २० टक्कयापर्यंत कमी होते.
ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा मनुष्याच्या गरजा आहेत, त्याचप्रमाणे सेक्सदेखील शारीरिक गरज आहे. जर आपण सेक्स करणे अचानक बंद केले तर भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यापासूनही आपणास सतर्क राहावे लागेल. स्कॉटलॅँडच्या संशोधकांनी दावा केला आहे की, सेक्स केल्याने ताणतणावाच्या परिस्थितीपासून आराम मिळतो. त्यांच्या मते, जे लोक दोन आठवड्यातून एकदा हमखास सेक्स करतात त्यांना इतरांपेक्षा तणाव कमी येतो. सेक्स दरम्यान मेंदू एंडोर्फिन आणि आॅक्सीटोसिन नावाचे होर्माेन काढतो, ज्यामुळे आपणास आनंदाची जाणीव होते. जे लोक सेक्स करणे बंद करतात, त्यांच्यात प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. शिवाय जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांच्यात कॅन्सर होण्याची शक्यता २० टक्कयापर्यंत कमी होते. सेक्स करणे बंद केल्याने आपण आपल्या प्रतिकार शक्तीलादेखील कमी करतात. विलकेस बेर यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून एक किंवा दोनदा सेक्स करतात त्यांच्या शरीरात सुमारे ३० टक्कयापर्यंत इम्युनोग्लोब्युलिन वाढते, जे कित्येक आजारांपासून आपणास वाचविते. जर्नर आरकाइव्ह आॅफ सेक्शुअल बिहेवियरमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, ज्या महिलांच्या आयुष्यात सेक्सची कमतरता असते, त्यांच्यात डिप्रेशनची संभावना अधिक असते. संशोधनानुसार, स्पर्ममध्ये आढळणारे तत्व जसे मेलाटोनिन, सेरोटोनिन आणि आॅक्सीटोसिन महिलांच्या मूडला आनंदी करण्यास मदत करतात. Also Read : SEX KNOWLEDGE : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती !