Lemon-Water Consuming Right Time: लिंबू पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून शरीराची आतून स्वच्छता होते. पचन तंत्र मजबूत होतं. भरपूर लोक नियमितपणे लिंबू पाणी पितात. पण अनेकांना लिंबू पाणी कधी प्यावं याबाबत माहीत नसतं.
सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जेवण केल्यावर लिंबू पाणी पितात. पण लिंबू पाण्याचा फायदा शरीराला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य वेळेवर सेवन कराल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी कधी प्यावं?
एक्सपर्टनुसार, लिंबू पाणी पिण्याची वेळ काय असावी हे तुमच्या आरोग्यावर आणि तुम्हाला यापासून काय हवं आहे यावर अवलंबून असतं. जर तुम्हाला हे पाणी वजन कमी करण्यासाठी प्यायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला डायजेशन म्हणजे पचन तंत्र मजबूत करावं लागेल. अशात जर तुम्ही जेवण करण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा टाकून सेवन कराल तर याचा फायदा जास्त होईल.
लिंबू पाणी पोटात गेल्यावर यातील अॅसिडमुळे पचनासाठी आवश्यक ज्यूस आणि बाईलची निर्मिती वाढते. याने आतड्यांमधील अवयव अन्न पचवण्यासाठी तयार होतात. तेच जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात तेव्हा भूकही कमी लागते. याने वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने तुम्ही कॅलरीही कमी करू शकता. याच कारणाने एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, वजन कमी करणाऱ्या लोकांनी लिंबू पाणी रिकाम्या पोटीच प्यावं.
पचनक्रिया सुधारण्यासाठी कधी प्यावं?
जर पचन तंत्र मजबूत करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर लिंबू पाण्याचं सेवन करायला हवं. जेवण केल्यानंतर लिंबू पाण्याचं सेवन केलं तर याने अन्न पचन चांगलं होईल. तसेच जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्या होत असेल तर ती सुद्धा होणार नाही.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण केल्यावर लगेच लिंबू पाणी पिता तेव्हा पोटाची आतून सफाई चांगली होते. अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होईल. जर जेवण केल्यावर अपचनाची समस्या होत असेल तर जेवण केल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने जास्त फायदा मिळेल.