स्वत:ला फीट ठेवण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात. पण ती मेहनत पुरेशी असते का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात सुरू असतात आणि कदाचित तुमच्याही मनात सुरू असतील. सामान्यपणे जास्त बिझी असणारे लोक वजन कमी करण्यासाठी १० हजार पावले चालतात. त्यांना असं वाटतं की, इतकं चालल्याने ते फीटही राहतील आणि वजनही कमी होईल. पण खरंच असं शक्य आहे का?
१० हजार पावलं चालण्यावरून वाद तेव्हा सुरू झाला होता जेव्हा जपानची एक कंपनी मॅनपो-केईने एक पॅडोमीटर तयार केलं होतं. या पॅडोमीटरला १० हजार पावलं मीटर म्हणजे '10,000 steps meter' असंही म्हटलं जात होतं. यावरून वाद सुरू झाला कारण हे अंतर जास्त तर होतंच पण पूर्णही केलं जाऊ शकत होतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, १० हजार पावलं चालण्याची ही कवायत तुम्हाला फिट राहण्यास किती मदत करू शकते.
किती कॅलरी होतात बर्न?
आजच्या आधुनिक युगात एकीकडे जिथे लोक टेक्निकच्या मदतीने बघतात की, त्यांच्या किती कॅलरी बर्न होतात. पण दुसरीकडे या टेक्निकवर पूर्णपणे विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही. एका अंदाजानुसार, एक व्यक्ती जेव्हा १ हजार पावलं चालतो तेव्हा तो ३० ते ४० कॅलरीपर्यंत बर्न करतो. म्हणजे १० हजार पावलात सहजपणे ३०० ते ४०० कॅलरी बर्न करता येतात. मात्र, हे पूर्णपणे खरं मानता येणार नाही. कारण कॅलरीज किती पावलांवर किती बर्न होतात हे स्टेप्ससोबतच व्यक्तीच्या वजनावर, चालण्याच्या जागेवर आणि स्पीडवर अवलंबून असतं.
एक्सरसाइजही गरजेची
तुम्हीही हे ऐकलं असेल की, एक्सरसाइज केल्यानेही तुम्ही फिट राहू शकता. पण किती एक्सरसाइज करून स्वत:ला फिट ठेवलं पाहिजे? याचं उत्तर रोग नियंत्रण केंद्र(Centre for Disease Control and Prevention) च्या एका रिपोर्टमध्ये मिळतं. या रिपोर्टनुसार, एका आठवड्यात एकूण १५० मिनिटे एक्सरसाइज केली तर तुम्ही फिट राहू शकता. यात १० हजार पावले चालणंही आहे.
काय आहे MET फंडा?
१० हजार पावले चालून किती कॅलरीज बर्न केली जाऊ शकतात. हे बघण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीला मेटाबॉलिक इक्विलंट(MET) म्हणतात. तुम्ही बसण्यात किंवा उभे होण्यात जेवढ्या ऊर्जेचा वापर करता त्याला One Met म्हणतात. जेव्हा तुम्ही तीन मैल अंतर साधारण जागेवरून एका तासात पूर्ण करता तेव्हा त्यासाठी 3.5 met ऊर्जा लागते. जेव्हा इतकंच अंतर पायऱ्यांनी चालता तेव्हा यात ६ Met ऊर्जा लागते.
ही आहे कॅलरीज चेक करण्याची योग्य पद्धत
आजच्या काळात लोक कॅलरीजचं प्रमाण बघण्यासाठी सामान्यपणे स्मार्ट वॉच किंवा अॅप्सचा वापर करतात. पण यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही. कॅलरीजचं प्रमाण बघण्यासाठी एक खास फॉर्म्यूला आहे.
Formula: Energy expenditure (in kcal/min) = 0.0175 x MET x weight (in kg)
उदाहरणार्थ - समजा एखाद्या व्यक्तीचं वजन ६८ किलो आहे. तो एका समतोल जागेवर ३ मैल प्रति तासाच्या वेगाने धावतो. ज्यात तो ३.५ Met ऊर्जेचा वापर करतोय. या स्थितीत तो प्रत्येक मिनिटाला ४ कॅलरीज बर्न करेल. म्हणजे एका तासात ४०० कॅलरीज बर्न करेल.
तेवढीच एक्सरसाइज गरजेची
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅलरीजचा हिशेब करावा लागेल. म्हणजे तुम्ही किती कॅलरीज घेतल्या आणि बर्न केल्या. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून अर्धा किलो वजन कमी करायचं असेल तर त्याला कमीत कमी १५० ते २०० मिनिटे एक्सरसाइज करावी लागेल आणि १० हजार पावलं पायी चालावं लागेल.
अशी करा सुरूवात
जर तुम्ही १० हजार पावलं चालण्याचा विचार करत असाल तर पहिल्या दिवशी इतकं चालण्यात समस्या होऊ शकते. जर तुम्ही तुमचंही वजन वाढलं असेल आणि तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही १ हजार पावलांपासून सुरू करू शकता. असे रोज १ हजार पावलं वाढवत रहा. तुम्ही काही दिवसात सहजपणे १० हजार पावलं चालू शकाल.
(टिप : वरील लेखातील मुद्दे हे केवळ माहितीसाठी वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आधी एखाद्या फिटनेस एक्सपर्टकडून मार्गदर्शन घ्या. त्यानंतर योग्य ती एक्सरसाइज करा. वरील लेखात आम्ही कोणताही दावा करत नाही. )