उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक गरमीपासून बचाव करण्यासाठी कलिंगड भरपूर खातात. कारण या पाण्याचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे शरीरा हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते. काही लोक तर असे असतात जे दिवसातून २ कलिंगड खाऊन टाकतात. पण जे लोक या दिवसांमध्ये जास्त कलिंगड खातात त्यांनी सावध होण्याची गरज आहे. कारण त्यांनी असं केलं तर त्यांना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कलिंगड खाण्याचे काही नुकसान सांगणार आहोत.
कलिंगडाचे नुकसान
प्रमाणापेक्षा जास्त कलिंगड खाल्ल्याने लिव्हरवर सूज येऊ शकते. ज्यामुळे लिव्हर हळूहळू कमजोर होऊ लागतं. जे लोक अल्कोहोलचं सेवन करतात त्यांना यामुळे अधिक समस्या होऊ शकते. इतकंच नाही तर ज्यांना डायबिटीस आहे त्यांनीही कलिंगडचं सेवन कमी करायचं. कारण कलिंगडात नॅचरल शुगर जास्त असते. कलिंगडात नॅचरल शुगर आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्ससारखे गुण असतात. ज्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांना यापासून नुकसान होऊ शकतं.
पचनासंबंधी समस्या
कलिंगडाचं अधिक सेवन केलं तर तुम्हाला पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. कलिंगडात फायबर जास्त असतं ज्यामुळे पोट फुगणे, गॅस, जुलाब आणि पोटदुखी अशा समस्या होतात. एका माहितीनुसार, कलिंगडात पोटॅशिअमही भरपूर असतं. ज्यामुळे किडनीसंबंधी समस्या असलेल्या लोकांमध्ये याचं प्रमाण असंतुलित होऊ शकतं.
हृदयासंबंधी समस्या
जर तुम्ही कलिंगडाचं जास्त सेवन केलं तर हृदयासंबंधी समस्याही होऊ शकतात. रोज गरमीच्या दिवसांमध्ये कलिंगड खाल्ल्याने इलेक्ट्रोलाइट आणखी संतुलित होतात. ज्यामुळे डोकेदुखी आणि मांसपेशींमध्ये कमजोरी अशा समस्या होतात.
एलर्जिक रिएक्शन
काही लोकांमध्ये कलिंगडाच्या सेवनाने एलर्जिक रिएक्शनही होऊ शकतं. जास्त कलिंगड खाल्ल्याने रॅशेज, त्वचेवर सूज, पिंपल्स आणि खाज सारख्या समस्या होतात. जास्त कलिंगड खाल्ल्याने शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त होऊन तुम्हाला ओवर हायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे कुणीही कलिंगड प्रमाणात खावं.