(Image Credit : www.avoskinbeauty.com)
गरमीपासून वाचण्यासाठी अलिकडे ऑफिसेस आणि घरांमध्ये अनेकजण एसीचा वापर करतात. अनेकांना तर एसीची सवय झाली आहे. त्यांना एसीशिवाय जराही चैन पडत नाही. पण एसीमुळे तुम्हाला थंडावा मिळत असला तरी एसीचे अनेक तोटेही आहेत. अनेक गंभीर समस्यांचा तुम्हाला एसीमुळे सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊ एसीमुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतात.
१) त्वचेसंबंधी समस्या
एसीचा सर्वात जास्त वाईट प्रभाव हा त्वचेवर पडतो. घाम येणे त्वचेच्या स्वच्छतेची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण दिवसभर एसीमध्ये बसल्यास तुम्हाला घाम येत नाही. त्यामुळे कार्बनसारखे घातक तत्व त्वचेवर चिकटतात, याने त्वचेसंबंधी अनेक आजार होऊ शकतात. यात त्वचेचा कॅन्सर याचाही धोका असतो. एसीमुळे तुमच्या त्वचा कोरडी होते.
२) ताप येणे
सतत एसीमध्ये बसल्याने तुम्हाला ताप येणे आणि थकवा जाणवणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नाही तर तापमान वाढवल्यास तुम्हाला डोकेदुखी आणि चिडचिड होऊ शकते. एसीमधून बाहेर गरम जागी गेल्यास तुम्हाला जास्त ताप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) सांधेदुखी
सतत एसीच्या कमी तापमानात बसणे केवळ गुडघ्यांचं दुखणंच नाही तर शरीराच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये दुखणं आणतं. हाडांच्या वेगवेगळ्या समस्याही तुम्हाला हळूहळू जाणवू लागतात.
४) ब्लड प्रेशर आणि अस्थमा
जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही एसीचा कमी वापर करणे तुमच्यासाठी चांगलं असेल. एसीमुळे तुम्हाला लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. त्यासोबतच श्वास घेण्यासही तुम्हाला त्रास होऊ शकतो. अस्थमाच्या रुग्णांची एसीपासून दूर रहायला हवं.
५) जाडेपणा
तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल पण हे खरंय. एसीच्या अतिवापरामुळे तुम्हाला जाडेपणाची समस्या होऊ शकते. तापमान कमी असल्याने शरीर अधिक सक्रिय राहत नाही आणि शरीरातील ऊर्जेचा योग्य प्रमाणात वापर होत नाही. त्यामुळे वजन वाढतं.
६) रक्तसंचार
एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने शरीराचं तापमान कृत्रिमरित्या अधिक कमी होतं आणि यामुळे पेशी आकुंचन पावतात. याच कारणाने शरीरात रक्तसंचार कमी होतो.