सध्या तरुणांमध्ये बॉडी बिल्डर बनण्याची मोठी क्रेझ आहे. मोठ मोठे बायसेप्स, पिळदार शरीरयष्टी साहजिकच लोकांचे लक्ष वेधून घेते. शरीर हे अतिशय मेहनतीने खूप व्यायाम करून कमावले तर त्याचा शरीराला तर फायदा असतोच आणि असे शरीर जास्त काळ टिकते सुद्धा. पण पटकन आपण एकदा मस्क्युलर दिसावे म्हणून अनेक जण प्रोटीन घ्यायला सुरुवात करतात. प्रोटीन जर मर्यादित प्रमाणात घेतले तर त्याचा शरीराला धोका नसतो. पण जर लवकर बॉडी बिल्डर होण्याच्या नादात त्याचा अतिरेक व ओव्हरडोस झाला तर मात्र त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
किती प्रोटीन घ्यावे?जर तुम्ही तुमच्या जिम ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली प्रोटीन डायट घेत असाल तर ते तुम्हाला तुमच्या आहारातील बदल आवर्जून सांगतील. कारण जेव्हा तुम्ही प्रोटीन डायट घेण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही तूमचा नेहमीचा सामान्य आहार घेऊ शकत नाही. जर त्यांनी स्वत:हून तुम्हाला याबद्दल काही सांगितले नाही तर तुम्ही त्यांना दिवसभर तुम्ही काय काय खाता ते अवश्य सांगा. जेणेकरून तुम्हाला नेमक्या किती प्रोटीनची गरज आहे ते ठरवून तुमच्या प्रोटीन शेकची मात्रा ठरवली जाईल.
प्रोटीनचा अतिरेक केल्यास या समस्या उद्भवतातप्रोटीन हे आपल्या शरीराला निरोगी आणि स्यायुंना मजबूत करण्यासाठी खूप गरजेचे आहे. पण याचा अर्थ हा अजिबात नाही की प्रोटीनचा ओव्हरडोस तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक मर्यादा असते जर त्या मर्यादेपेक्षा जास्त त्या गोष्टीची मात्र झाली तर ती गोष्ट वाईटच ठरते. जास्त प्रोटीनमुळे स्नायू निर्माणाची जागा कमजोर होऊ शकते. आता आपण पाहूया अधिक प्रमाणात प्रोटीन घेतल्याने सामान्यत: कोणत्या समस्या उद्भवतात.
पोटात गॅस तयार होणे, घेतलेला आहार योग्य पद्धतीने न पचणे, नेहमी पोट आणि पूर्ण शरीर जड जड भासणे, विष्ठा योग्य प्रकारे न होणे. विष्ठा करताना वेदना होणे, पायदुखी सुरु होणे, चालताना किंवा उभे राहिल्यावर पायाच्या टाचा दुखणे, या शिवाय सुद्धा अनेक गंभीर आजार योग्य वेळेस प्रोटीनचा ओव्हर डोस न थांबवल्यास होऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला शरीर कमवायचे असेल, बॉडी बिल्डर व्हायचे असेल तर व्यायामाचाच आधार घ्या आणि प्रोटीनचे प्रमाण मर्यादित ठेवा. कोणताही शॉर्टकट हा घातक असतो हे नेहमी लक्षात असू द्या.