शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

Cholesterol Side effects: 'या' पदार्थांमुळे तुमच्या शरीरात वाढतं कॉलेस्ट्रॉल, 'अशी' ओळखा लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 5:39 PM

कोलेस्ट्रॉलचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) जे शरीरासाठी अपायकारक असतं आणि दुसरं म्हणजे गुड किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) जे शरीरासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सप्रमाणे आवश्यक असतं.

आपण आहारात तेलकट पदार्थांचा अधिक समावेश केला तर त्याच्यामुळं शरीरात अपायकारक कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. या समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे, हे वेळीच जाणून घेणं.

कोलेस्ट्रॉल म्हणजे पेशींबाहेरील एका विशेष घटकापासून बनलेला थर असतो. वैद्यकशास्त्रात याला लिपीड (Lipid) असं म्हणतात. कोलेस्ट्रॉलचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) जे शरीरासाठी अपायकारक असतं आणि दुसरं म्हणजे गुड किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) जे शरीरासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सप्रमाणे आवश्यक असतं.

उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी आहे धोकादायकझी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा कोलेस्टेरॉल वाढतं, तेव्हा हृदयाजवळ असलेल्या धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते आणि रक्त प्रवाहात समस्या निर्माण होतात. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. सकस पदार्थ खाण्याव्यतिरिक्त आपण दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. अन्यथा, कॅलरीज बर्न न झाल्यामुळं शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते.

कोलेस्ट्रॉल वाढलंय की नाही हे कसं ओळखावं?

  • कोलेस्टेरॉल वाढल्याचं लिपिड प्रोफाइल ब्लड टेस्टद्वारे (Lipid Profile Blood Test) ओळखलं जातं.
  • अँजिओग्राफीमुळं (Angiography) हृदयाच्या धमन्या किती ब्लॉक झाल्या आहेत किंवा अरुंद झाल्या आहेत, हे कळतं.
  • मेंदूमध्ये ब्लॉकेज असेल तर मेंदूतील रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी करावी लागेल.

हा त्रास कसा टाळायचा?शरीरातील चरबीची वाढ थांबवायची असेल तर, हेल्दी कोलेस्ट्रॉल (Healthy cholesterol) म्हणजेच शरीरासाठी चांगलं असलेलं कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणं सुरू करा. त्याला वैद्यकीय भाषेत उच्च घनता लिपोप्रोटीन (High-density lipoprotein) किंवा एचडीएल (HDL) म्हणतात. याच्या सेवनानं हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) धोका कमी होतो.

या पदार्थांमध्ये असतं खराब कोलेस्ट्रॉल

  • लोणी
  • फास्ट फूड
  • जंक फूड
  • चीज
  • साखर
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स