Lemon water Side Effects : अनेकदा एक्सपर्ट्स वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. पण बरेच लोक लिंबू पाण्याचं अधिक सेवन करतात. त्यांचा असा समज असतो की, जास्त लिंबू पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होईल. पण हा मोठा गैरसमज आहे. कारण लिंबू पाणी जास्त प्यायल्यानेही आरोग्याचं मोठं नुकसान होतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) दातांचं नुकसान
जर तुम्हाल लिंबू खाणे पसंत आहे आणि तुम्ही याचं जास्त सेवन करत असाल तर याचा तुमच्या दातांवर वाईट प्रभाव पडू शकतो. लिंबूमध्ये सिट्रस अॅसिड असतं जे दातांना लागल्यावर दातांच्या कोटिंगचं नुकसान होतं. जर लिंबू पाण्याचं सेवन करायचंच असेल तर स्ट्रॉ चा वापर करु शकता.
२) छातीत जळजळ होणे
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांच्यासाठी लिंबूचं जास्त सेवन करणे विषासारखं ठरु शकतं. असे यासाठी कारण त्यात आधीच अॅसिड असतं जे तुमच्या छातीत आणखी जास्त जळजळ निर्माण करु शकतं.
३) हाडे होऊ शकतात कमजोर
लिंबाच्या जास्त सेवनामुळे तुमची हाडे कमजोर होऊ शकतात. याचं कारण आधी सांगितलं तसं यात सिट्रस अॅसिड अधिक असतं. त्यामुळे लिंबूचं सेवन योग्य प्रमाणातच केलेलं बरं.
४) शरीरात पाणी होतं कमी
जर तुम्ही लिंबू पाण्याचं बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करत असाल तर हे कमी करा. लिंबू पाण्याच्या जास्त सेवन केल्याने शरीरातील आवश्यक पोषत तत्वे शोषून घेतं. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.
५) किडनी स्टोनची समस्या
लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
एका दिवसात किती लिंबू पाणी प्यावं?
लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.