शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
3
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
4
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
5
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
7
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
8
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
9
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
10
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
11
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
12
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
13
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
14
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
15
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
16
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
17
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
18
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
19
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
20
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा

पावसाळ्यात भुट्टा खाल्ल्यावर जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:36 AM

Water after eating bhutta : मका खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त लोक एक चूक करतात. जी केल्यावर आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

Water after eating bhutta : रिमझिम पाऊस आणि त्यात मक्याचं भाजलेलं कणीस खाणं सगळ्यांनाच आवडतं. पावसात गरम गरम कणीसावर लिंबाचा रस, थोडं मीठ आणि तिखट लावून खाणं ही एक मेजवानीच असते. याची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यास फायदेशीर असतात.

इतकंच नाही तर भुट्टा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरिक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच मका खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त लोक एक चूक करतात. जी केल्यावर आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

भुट्टा खाल्यावर पाणी पिण्याचे तोटे

भुट्टा खाल्यानंतर जास्तीत जास्त लोक पाणी पितात. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याने वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. नेहमीच प्रयत्न असावा की लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकतं. यासोबतच पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो. अनेकदा ही समस्या गॅस्ट्रोपॅरीसिसस या रोगाचं रुप घेते. यामुळे पोटात दुखणे आणि गॅस होणे ही समस्या होते.

कधी कधी इतका त्रास होतो की, व्यक्ती जेवणही करु शकत नाही. मक्याच्या दाण्यांमध्ये कार्बोस आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा या दोन्ही तत्वांमध्ये पाणी मिसळतं तेव्हा पोटात गॅस जमा होते. ज्यामुळे पोटात दुखणे, अॅसिडिटी आणि आणखीही काही गंभीर समस्या होतात. त्यामुळे भुट्ट्यावर पाणी पिऊ नये.

किती वेळाने प्यावे पाणी?

भुट्टा खाल्यानंतर पाणी न पिण्याची गोष्ट ऐकून मग पाणी प्यायचं कधी? असा प्रश्न पडला असेल. प्रश्न योग्यही आहे. भुट्टा खाल्यानंतर साधारण ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. किंवा भुट्टा खाण्याआधीही पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला होणारी समस्या होणार नाही.

भुट्टा खाण्याचे फायदे

१) मका आपल्याला होणाऱ्या सामान्य समस्या जसे की, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मक्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात जे आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढतं. 

२) मका प्रत्येक वयाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. यात मॅग्नेशिअम आणि आयर्न असतात जे हाडं मजबूत करण्यासाठी उपयोगी असतात. त्यासोबतच कॉर्नमध्ये झिंक आणि फॉस्फोरस असतात जे फायदेशीर आहे. 

३) मक्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात त्याने शरीराला एनर्जी मिळते. याने तुमचा आळसही दूर होतो. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि काम करण्याचा आळस येत असेल तर आहारात कॉर्नचा म्हणजेच मक्याचा समावेश करा. 

४) मका तुमच्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण यात व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतं. हे खाल्ल्याने डोळ्यांसंबंधी समस्या जसे मॅक्युलर डी जनरेशन होत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य