टोमॅटोआरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लायकोपीन मुबलक प्रमाणात आढळतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही एका दिवसात १-२ पेक्षा जास्त टोमॅटो खाल्ले तर तुमची तब्येतही बिघडू शकते. जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे जाणून घेऊया...
ॲसिडिटीची समस्या
टोमॅटोमध्ये नैसर्गिकरित्या ॲसिड असतं, ज्यामुळे त्याची चव आंबट असते. जास्त टोमॅटो खाल्ल्याने पोटात ॲसिडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, पोट फुगणं आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला आधीच ॲसिडिटीची समस्या असेल तर टोमॅटोचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
किडनी स्टोनचा धोका
टोमॅटोमध्ये ऑक्सालेट नावाचे घटक आढळतात. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सालेट जमा झाल्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला आधीच किडनी संबंधित समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टोमॅटोचं सेवन करा.
सांधेदुखी
टोमॅटो खाल्ल्यानंतर काही लोकांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. असं म्हटलं जातं की टोमॅटोमध्ये काही घटक असतात ज्यामुळे जळजळ होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास असेल तर टोमॅटोच्या सेवनाकडे लक्ष द्या.
त्वचेशी संबंधित समस्या
जास्त टोमॅटो खाल्ल्याने त्वचेवरही परिणाम होतो. यामध्ये जास्त प्रमाणात लाइकोपीन असल्याने त्वचेचा रंग पिवळा होऊ शकतो. ही समस्या सहसा गंभीर नसते आणि टोमॅटोचे सेवन कमी केल्यानंतर बरी होते.
डायरियाचा धोका
साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया टोमॅटोमध्ये आढळतो. टोमॅटो नीट धुवून खाल्ले नाहीत तर डायरियाचा धोका वाढतो. त्यामुळे टोमॅटो खाण्यापूर्वी ते चांगले धुवून घ्या.