Mistakes While Having Green Tea: वजन कमी करायचं असेल, स्कीनवर ग्लो आणायचा असेल, पचनक्रिया सुधारायची असेल किंवा शरीरात एनर्जी हवी असेल तर ग्रीन टी चं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल बरेच लोक ग्रीन टी चं सेवन करतात. ग्रीन टी चे शरीराला अनेक फायदे मिळतात. ग्रीन टीमुळे इम्यूनिटी सुद्धा मजबूत होते.
ग्रीन टी सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. पण काही लोकांना ग्रीन टी चं सेवन करण्याची योग्य पद्धत माहीत नाही. अशात याचं सेवन करताना ते अनेक चुका करतात. अनेकांना हे माहीत नाही की, ग्रीन टी चं सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. असं केलं नाही तर याचे फायदे मिळण्याऐवजी शरीरावर साइड इफेक्ट होतील.
1) प्रमाणात प्या
तुम्हाला माहीत असेलच की, ग्रीन टी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण काही लोकांना वाटतं की, याचं जास्त सेवन केल्याने जास्त फायदे मिळतील. पण असं नाहीये. कोणत्याही गोष्टीची अती केली तर आरोग्याला नुकसान होतं. त्यामुळे ग्रीन टी चं सेवन सुद्धा प्रमाणात केलं पाहिजे. जर जास्त सेवन केलं तर चिंता, झोप न येणे आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात.
2) योग्य वेळ
ग्रीन टी मध्ये कॅफीन असतं. अशात जर तुम्ही रात्रीच्या वेळी याचं सेवन कराल तर याने स्लीपिंग पॅटर्नवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री ग्रीन टी चं सेवन करणं टाळा. कधीही झोपण्याआधी याचं सेवन करू नये.
3) रिकाम्या पोटी पिऊ नये
काही लोकांनी सकाळी झोपेतून उठताच चहा पिण्याची सवय असते. अशात लोक ग्रीन टी सुद्धा सकाळीच रिकाम्या पोटी घेतात. पण ग्रीन टी चं सेवन करून तुम्ही दिवसाची सुरूवात करत असाल तर हे योग्य ठरणार नाही. ग्रीन टी मध्ये टॅनिन असतं. ज्याने पोटात अॅसिड तयार होतं. त्यामुळे रिकाम्या पोटी ग्रीन टी चं सेवन करू नका.
4) जेवण केल्यावर लगेच पिऊ नये
जर तुम्ही जेवण केल्यावर लगेच ग्रीन टी चं सेवन करत असाल तर हे चुकीचं आहे. याने जेवणातील पोषक तत्व मिळवण्यात समस्या होते. जेवण केल्यावर लगेच याचं सेवन केलं तर आयरनचं अब्जॉर्प्शन करण्यातही अडथळा येतो. ज्यामुळे एनीमिया होऊ शकतो. तुम्ही ग्रीन टी जेवण केल्यानंतर 1 ते 2 तासांनंतर पिऊ शकता.
5) ग्रीन टी चं बॅग रियूज करू नये
काही लोक ग्रीन टी च्या बॅग्स पुन्हा वापरतात. पण असं अजिबात करू नये. कारण याचा पुन्हा वापर केला तर याने टेस्ट चांगली मिळणार नाही. तसेच ग्रीन टी चं सेवन असं अनहेल्दी पद्धतीने करू नका. नेहमीच याची फ्रेश पानेच वापरा.