बऱ्याचदा लोक कामात इतके बिझी असतात की, लघवी लागल्यावरही बाथरूमला जात नाहीत. जोरात लघवी लागली असेल तरी रोखून ठेवतात. ही सवय सामान्य वाटू शकते, पण एक्सपर्टनुसार, लघवी बराचवेळ रोखून ठेवल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. लघवी वेळेवर पास करणं आपल्यासाठी तेवढंच गरजेचं आहे, जेवढं जेवण करणं किंवा पाणी पिणं. कारण लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
लघवी रोखून ठेवण्याचे नुकसान
यूटीआयचा धोका
लघवी रोखून ठेवल्याने यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. लघवी जास्त रोखल्याने मूत्राशयामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ शकतात, जे पुढे जाऊ इन्फेक्शनचं कारण ठरतात. तसेच पुन्हा पुन्हा यूटीआयची समस्या झाली तर किडनी प्रभावित होऊ शकते.
मूत्राशयाची क्षमता होते प्रभावित
पुन्हा पुन्हा लघवी रोखून धरल्याने मूत्राशयाचे मसल्स कमजोर होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू याची क्षमताही कमी होऊ लागते, ज्यानंतर मूत्राशय पूर्णपणे रिकामं होऊ शकत नाही. यामुळे लघवी करताना जळजळ आणि वेदना होऊ शकते.
किडनीवर दबाव
बराचवेळ लघवी रोखल्याने किडनीवरही दबाव पडतो. ज्यामुळे किडनीची काम करण्याची क्षमता प्रभावित होते. नेहमीच तुम्ही असं करत असाल तर किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोकाही वाढतो.
मूत्राशयात सूज
लघवी रोखल्याने मूत्राशयात सूज येऊ शकले, ज्यामुळे लघवी करताना वेदना, जळजळ होते. काही गंभीर केसेसमध्ये मूत्राशयात इन्फेक्शन होतं आणि सूज किडनीपर्यंत पोहोचते.
निरोगी राहण्यासाठी काय?
जर लघवी आल्याचा संकेत मिळत असेल, रोखण्याऐवजी लगेच बाथरूमला जावे. कामातून थोडा वेळ काढा आणि मूत्राशय जास्त वेळ भरून राहू देऊ नका.