Symptoms Of Kidney Damage: मेंदू आणि हृदयाप्रमाणे किडनीही आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण अवयव आहेत. जसे मेंदू फीट ठेवण्यासाठी मेडिटेशन केलं जातं, त्याप्रमाणे शरीर फीट ठेवण्यासाठी डाएट आणि रोजचं रुटीन चांगलं ठेवावं लागतं. याप्रमाणे किडनीचीही खास काळजी घ्यावी लागते. अनेकदा असं होतं की, आपल्या किडनीमध्ये आतल्या आत समस्या होते आणि आपल्याला हे कळतही नाही. किडनीमध्ये काही समस्या असेल तर आपल्या शरीरात काही बदल होऊ लागतात. जे आपण ओळखणं फार गरजेचं असतं. जर वेळीच हे संकेत ओळखले तर किडनीसंबंधी समस्या होणार नाही. चला जाणून घेऊ काही संकेत ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
फार जास्त थकवा
शरीरात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष केलं तर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. लक्षात ठेवा की, कमी काम करूनही शरीरात लवकर आणि जास्त थकवा जाणवत असेल तर हऊ शकतं की, तुमच्या शरीरात विषारी पदार्थांचं प्रमाण वाढू लागलं आहे. हे पदार्थ शरीराला वाईट प्रकारे प्रभावित करतात. त्यासोबतच रक्तातही विषारी पदार्थ वाढू लागतात आणि पुढे जाऊन किडनी खराब होऊ लागते.
झोप न येणे, त्वचेवर खाज
स्लीप एपनिया म्हणजे झोप न लागण्याची समस्या किडनीच्या आजारांशी संबंधित असते. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नाही तर पुढे जाऊन किडनी डॅमेजचा धोका राहतो. जर तुमची त्वचा ड्राय आणि रखरखीत झाली असेल आणि त्यावर खाजेची समस्या असेल तर वेळीच सावध व्हा. लगेच डॉक्टरांना संपर्क करून किडनीची टेस्ट करा. असं रक्तात विषारी पदार्थांचं प्रमाण वाढल्याने होतं. पायावर सूज हेही किडनीसंबंधी समस्येचं कारण आहे. अशात ही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.