शरीरातील हार्मोन्स जास्त किंवा कमी प्रमाणात डिसचार्ज होण्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरात हार्मोन्सचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. अलिकडे महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात बघायला मिळत आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लाइफस्टाइलमध्ये बदल आणि चुकीचं खाणं-पिणं. ४० ते ४० वयाच्या महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण वेळीच ही लक्षणे ओळखून त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊ महिलांच्या हार्मोन्स असंतुलनाचे संकेत....
राग येणे किंवा चिडचिडपणा करणे
हार्मोन्स असंतुलित झाल्याने सर्वात पहिला बदल तुमच्या मूडवर दिसेल.याचा थेट प्रभाव तुमच्या मानसिक आरोग्यावर पडतो. तुमचा स्वभवा चिडखोर होतो. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर संतापता.
झोप कमी आणि थकवा
जर तुम्हाला सतत झोप येते. काहीही काम न करता तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. याचं कारण हार्मोन्समध्ये झालेले बदल आहेत. जेव्हा हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा आपल्या शरीरात प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढतं, ज्याने आपल्याला सतत थकवा जाणवत राहतो.
खूप जास्त घाम येणे
जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर यामागचं कारण हार्मोन्समधील बदल असू शकतो. कारण हार्मोन्समध्ये बदल झाल्यावर शरीराच्या तापमानातही बदल होतो. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जास्त भूक लागणे
जर तुम्हाला अचानक जास्त भूक लागत असेल हाही हार्मोन्स असंतुलित होण्याचा इशारा आहे. जेव्हा आपल्या शरीरात एस्ट्रोजेन हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त भूक लागते. इतकेच नाही तर तुम्ही जास्त खाऊ लागता ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.
डिप्रेशन
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक महिलांना तणावाचा सामना करावा लागतो. जर वेळेवर यावर उपाय केले नाही तर हा तणाव डिप्रेशनचं रुप घेऊ शकतं. अशात वेळेवर यावर उपचार करणे गरजेचे आहे.
शारीरिक संबंधात कंटाळा
हार्मोन्समध्ये असंतुलन आल्यानंतर याचा प्रभाव वैवाहीक जीवनावरही पडू शकतो. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने आपल्या शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास रस राहत नाही.
स्मरणशक्ती कमी होणे
हार्मोन्सच्या बदलामुळे अनेक महिलांची स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या होऊ शकते. त्या छोट्या छोट्या गोष्टी विसरु लागतात. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर हा हार्मोन्समधील बदलाचा इशारा आहे.
पिंपल्स
जर तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा पिंपल्स येत असतील आणि ठिक होण्याचं नावही घेत नसतील तर हार्मोन्समध्ये बदल झालाय असेल समजा.