Symptoms Of Heart Blockage: आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आपल्या खाण्या-पिण्याकडे आणि झोपण्याच्या वेळेकडे अजिबात लक्ष नाही. ज्यामुळे आजकाल कमी वयातच हार्ट अटॅकच्या केसेस वाढत आहेत. लोक या आजाराने ग्रस्त होऊन आपला जीव गमावत आहेत. लोकांच्या हार्टच्या नसांमध्ये ब्लॉकेज येत आहेत, ज्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येतो. नसांमध्ये झालेले हे ब्लॉकेज शरीरात 5 संकेतांच्या माध्यमातून दिसतात. जर वेळीच हे संकेत ओळखले तर तुम्ही जीव वाचवू शकता.
हार्ट अटॅक येण्याचे संकेत
हृदयाचे ठोके अनियमित होणं
जेव्हा हृदयाच्या नसा ब्लॉक होऊ लागतात तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. कारण यामुळे रक्ताच्या नसांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. अशी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे.
थकवा
जर तुम्हाला काहीही करताना थकवा जाणवत असेल तर हे हृदयाची नसे ब्लॉक होण्याचं लक्षण असू शकतं. असंही होऊ शकतं की, तुमच्या नसांमध्ये रक्तप्रवाह योग्यपणे होत नसेल. अशात या संकेताकडे दुर्लक्ष करू नये.
छातीत वेदना
जर तुमच्या छातीत वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर त्याला सामान्य वेदना समजून दुर्लक्ष करू नका. हे हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याचं लक्षण असू शकतं. दुर्लक्ष केलं तर ही वेदना खांद्याच्या खाली बोटांपर्यंत पसरू शकते.
श्वास भरून येणे
काही अंतर चालूनही तुम्हाला श्वास भरून येत असेल किंवा बसल्या-बसल्या तुम्हाला जोरात श्वास घ्यावा लागत असेल तर हाही तुमच्या नसा ब्लॉक होण्याचा संकेत असू शकतो. वेळीच डॉक्टरांना दाखवा.
चक्कर येणे
जर तुम्हाला विनाकारण चक्कर येत असेल किंवा बेशुद्ध होत असाल तर हे घातक आहे. याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात आणि तुमचं हृदय तुमची साथ सोडत आहे. अशात वेळीच डॉक्टरांना दाखवा.