Signs of high cholesterol : आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. याच कारणामुळे लोकांना डायबिटीस, हाय बीपी, हृदयरोग असे गंभीर आजार होत आहेत. यातील एक सगळ्यात घातक बाब म्हणजे कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते तेव्हा ते चांगलं महागात पडतं. कारण जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा हृदयाच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होऊ लागतो. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका असतो. त्यामुळे गरजेचं आहे की, शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल नेहमी कंट्रोलमध्ये ठेवावं.
काय आहे पेरिफेरल आर्टरी डिजीज?
जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते तेव्हा शरीरावर काही लक्षणे दिसू लागतात. बॅड कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात वाढू लागतं तेव्हा हात-पायांच्या नसांमध्ये प्लाक जमा होऊ लागतो. या कंडिशनला पेरिफेरल आर्टरी डिजीज म्हटलं जातं. ही समस्या जास्तकरून पायांमध्ये होते. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर हात-पायांवर दिसणारी लक्षणं खालीलप्रमाणे सांगता येतील.
हाय-पायांमध्ये झिणझिण्या
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हात-पायांच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होऊ लागतो. ज्यात रक्तप्रवाह प्रभावित होतो. हात-पायांमध्ये जेव्हा व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही तेव्हा झिणझिण्या येण्याची समस्या होते.
पायांमध्ये क्रॅम्प्स
पायांच्या धमण्या जेव्हा ब्लॉक होऊ लागतात तेव्हा त्यात रक्ताद्वारे ऑक्सीजन पोहोचू शकत नाही. ज्यामुळे चालण्यासही समस्या होऊ शकते. त्यामुळेच शरीर जास्तीत जास्त अॅक्टिव ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पायांमध्ये सतत वेदना आणि झिणझिण्या हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण आहे.
हात-पाय थंड पडणे
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर हात आणि पाय थंड पडतात. यातून हे स्पष्ट होतं की, शरीरात रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाहीये. त्यामुळे अशी काही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा उपाय
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तसे तर वेगवेगळे उपाय आहेत. मात्र, एका रिसर्चमधून समोर आलं की, रोज एक किंवा 2 सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल बरंच कमी होतं. सफरचंदामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होऊन हृदय चांगलं राहतं.
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पॉलिफेनॉल्स आढळतात, जे शरीरात जाऊन आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. हे पोषक तत्व आपल्या रक्तवाहिन्या रिलॅक्स करण्यास मदत करतात आणि यात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल बाहेर काढतात.हा रिसर्च ब्रिटनची यूनिवर्सिटी ऑफ रीडिंगच्या वैज्ञानिकांनी इटलीच्या वैज्ञानिकांसोबत मिळून केला होता. हा रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला होता.