हृदयविकार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे आणि त्याच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण आता एका नवीन संशोधनातून असं दिसून आलं आहे की कान दुखणं हे देखील हार्ट अटॅकचं एक 'सायलेंट' लक्षण असू शकतं. अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) ने प्रकाशित केलेल्या संशोधनात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
या संशोधनानुसार, हार्ट अटॅकदरम्यान, रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतोच, परंतु काही वेळा या गुठळ्या जमा होऊन कानाच्या नसांपर्यंतही पोहोचतात. यामुळे कान दुखणे किंवा ऐकू न येणे यासारख्या समस्या गंभीर उद्भवू शकतात.
संशोधकांनी या अभ्यासासाठी हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 500 हून अधिक रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केलं. त्यांना असं आढळून आलं की ज्या रुग्णांना हार्ट अटॅक आला होता त्यांच्यापैकी 12% रुग्णांना कानाची समस्या देखील होती. यापैकी निम्म्या रुग्णांच्या कानात दुखत होतं, तर बाकीच्यांना कमी ऐकू येण्याची समस्या जाणवत होती.
या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. डेव्हिड मिलर म्हणतात की, या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कान दुखणं हे हार्ट अटॅक येण्यामागचं एक संभाव्य लक्षण असू शकतं, विशेषत: ते अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय उद्भवतं. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
संशोधकांनी असंही स्पष्ट केलं आहे की केवळ कान दुखणं हे हार्ट अटॅकचं लक्षण नाही. कानाचा संसर्ग, साइनसायटिस किंवा मायग्रेन यांसारख्या इतर समस्यांचंही हे लक्षण असू शकतं म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.
या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, कधीकधी छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यात अडचण यासारखी हृदयविकाराची लक्षणं जाणवत नाहीत. अशा परिस्थितीत, सायलेंट लक्षणांकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. कान दुखणं हे विशेषत: वृद्ध आणि मधुमेही रुग्णांमध्ये हार्ट अटॅकचे संभाव्य लक्षण असू शकते. डॉ. मिलर म्हणतात की, आपल्याला हृदयविकाराच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवण्याची आवश्यकता आहे.