शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

जिममध्ये वर्कआऊट करण्याचा कंटाळा येतो? मग ट्राय करा 'हे' उपाय अन् बेली फॅटला म्हणा बाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 10:44 AM

आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सांगणार आहोत. ज्या अगदी सोप्या आहेत आणि प्रभावीसुद्धा. तुम्ही रोज या अ‍ॅक्टिव्हिटीज केल्यास तुम्हाला बेली फॅटच्या समस्येला समोरच जावे लागणार नाही.

फिट राहणे, बेली फॅट नसणे हे केवळ चांगले दिसण्यासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीदेखील गरजेचे असते. पोटावरील वाढलेल्या चरबीमुळे अनेकदा आपली लोकांमध्ये लाजिरवाणी अवस्था होते. त्याचबरोबर या वाढलेल्या चरबीमुळे आपल्या काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सांगणार आहोत. ज्या अगदी सोप्या आहेत आणि प्रभावीसुद्धा. तुम्ही रोज या अ‍ॅक्टिव्हिटीज केल्यास तुम्हाला बेली फॅटच्या समस्येला समोरच जावे लागणार नाही.

धावणेस्टाईलक्रेजने दिलेल्या माहितीनुसार, तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवण्यासाठी धावणे फायद्याचे ठरू शकते. धावल्यामुळे हृदय चांगले काम करते आणि अतिरिक्त कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी साचत नाही आणि वाढलेली चरबी हळूहळू कमी होऊ होते. सुरुवातीला फक्त काही मीटर धावा आणि हळू धावा. शरीराला सवय झाली की वेग, अंतर आणि वेळ वाढवता येतात. धावणे हा पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्याचा एक मार्ग आहे.

पोहणेपोहणे हादेखील कंबर आणि पोट कमी करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. पोहणे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर शरीराला चांगले आकार देऊ शकते. तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. जर तुम्ही यापूर्वी कधीही पोहणे केले नसेल, तर ते फक्त प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली केले पाहिजे.

सायकलिंगपोट कमी करण्याचा व्यायाम म्हणून सायकलिंग देखील करता येते. हा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा कार्डिओ व्यायाम मानला जातो. हा पाय आणि मांड्या यांचा चांगला व्यायाम होऊ शकतो. यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीजही कमी करता येतात. सायकलिंगच्या फायद्यांमध्ये कंबरेची चरबी कमी करणेदेखील समाविष्ट असू शकते.

चालणेवाढलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये चालणेदेखील समाविष्ट आहे. रोज सकाळ संध्याकाळी अर्धा तास चालता चालल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. यामुळे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबीही कमी होऊ शकते. शक्य असल्यास वेगवान पायऱ्यांनी जा. वाढलेले पोट कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो.

पायऱ्या चढणेपोटाची चरबी कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे आणि उतरणेदेखील फायद्याचे ठरते. पोट कमी करण्यासाठी हा व्यायामा उत्तम आहे. पायऱ्या चढून आणि उतरूनही अतिरिक्त चरबी कमी करता येते. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुमारे 10 मिनिटे घराच्या पायऱ्या चढणे आणि उतरणे सुरू करता येते. ऑफिसला जातानाही लिफ्टऐवजी जिने वापरणे ही कंबर आणि पोट कमी करण्याच्या उपायांमध्ये समाविष्ट होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स