(Image Credit : www.medicalnewstoday.com)
कंबरदुखीची समस्या कोणत्याही कारणाने होऊ शकते. जसे की, जास्त जड वस्तू उचलल्याने, हेवी वर्कआउटने, जास्त वेळ बसून राहिल्याने इत्यादी. अशात कंबरदुखी होत असेल तर कशातही लक्ष लागत नाही आणि काही कामही होत नाही. मात्र ही कंबरदुखीची समस्या तुम्ही काही घरगुती उपायांनी दूर करू शकता. जाणून घेऊ काय आहेत हे घरगुती उपाय....
मसाज
(Image Credit : Social Media)
मोहरीचं तेल, ऑलिव्ह ऑइल, लॅवेंडर ऑइल यातील कोणतंही तेल गरम करून हलक्या हाताने कंबरेची मालिश करा. दरम्यान अंगठ्याने पाठीच्या कण्यावर हलकं प्रेशर टाकून मसाज करा. पण हे करत असताना फार जास्त प्रेशर टाकू नये. मालिश केल्यावर काही वेळाने तुम्हाला आराम मिळेल.
सैंधव मीठ
एक वाटी सैंधव मीठ बादलीभर पाण्यात टाका आणि या पाण्याने आंघोळ करा. काही वेळानेच तुमची कंबरदुखी दूर होईल.
मेथी दाणे
(Image Credit : Social Media)
एक चमचा मेथी दाणे घ्या आणि त्याची पावडर तयार करा. हे पावडर एक ग्लास गरम दुधात टाका आणि त्यात एक चमचा मधही मिश्रित करा. एक एक घोट घेत हे दूध सेवन करा. एका तासात तुम्हाला कंबरदुखीपासून आराम मिळेल.
हळद
वेदना कोणतीही असो त्यावर हळद हा एक उत्तम उपाय मानला जातो. एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद पावडर मिश्रित करा आणि हळूहळू सेवन करा. रात्री हे हळदीचं मिश्रित दूध सेवन करा, सकाळी तुम्हाला आराम मिळेल.
आलं
एक ते दोन चमचे आल्याचे तुकडे घ्या आणि बारिक करा. हे बारिक केलेलं आलं एक कप गरम पाण्यात टाका आणि त्यात एक चमचा मध मिश्रित करा. याचं हळूहळू सेवन करा. आल्यामध्ये जिंजरोल नावाचं तत्व असतं, ज्याने वेदना आणि सूज कमी होते.
लसूण
लसणाच्या ८ ते १० कळ्यांची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट कंबरेवर लावा. नंतर गरम पाण्यात टॉवेल पिळून लसणाच्या पेस्टवर ठेवा. २० ते ३० मिनिटांनी पेस्ट स्वच्छ करा, तुम्हाला आराम मिळेल.