(Image Credit : MavCure.Com)
अलिकडे एकाच जागेवर तासंतास बसून कराव्या लागणाऱ्या कामांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होऊ लागल्या आहेत. नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आले की, दिवसभर जास्त बसल्या कारणाने एक्सरसाइजमुळे शरीराला होणारे मेटाबॉलिक फायदे नष्ट होतात. मेटाबॉलिज्मची प्रक्रिया ही जीवनासाठी महत्त्वाची आहे. याचा संबंध अन्न पचवण्याच्या क्रियेशी जुळलेला आहे. एप्लाइड फिजिओलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमधून चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. निष्क्रियतेमुळे आपलं शरीर अनहेल्दी तर होतंच, पण याने एक्सरसाइजने शरीराला होणारे फायदेही नष्ट होतात.
(Image Credit : Irish Times)
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सतत एकाच जागी बसून राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा धोका असतो. अशात लोकांना अनेक प्रकारच्या मेटाबॉलिक समस्या होऊ शकतात, ज्यामुळे डायबिटीज, हृदयरोगांचा धोका वाढतो.
निष्क्रियता आणि एक्सरसाइज यात विचित्र संबंध आहे. एकाच जागेवर बसून राहिल्याने आपल्या शरीरावर काय विचित्र प्रभाव होतात? बसून राहिल्याने एक्सरसाइजमुळे होणारे फायदे नष्ट होतात का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अभ्यासकांनी रिसर्च केला.
(Image Credit : Viral Bake)
टेक्सास यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी दहा निरोगी आणि सक्रिय ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या समूहाला सतत चार दिवस दिवसातील १३ तास एकाच जागेवर बसून ठेवले. यात सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते जागेवरुन फार जास्त हलले नाहीत. त्यांना केवळ चार पावलं हालचाल करावी असं सांगण्यात आलं. त्यांच्या शरीरावर एक्टिविटी मॉनिटर लावण्यात आले. कमी कॅलरी असलेलं जेवण देण्यात आलं.
पावच्या दिवशी त्यांचं शरीर सैल आणि सुस्त झालं होतं. नाश्त्यानंतर त्यांच्या शरीरात ब्लड शुगर आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण अधिक आढळलं. त्यांच्या शरीरात इन्सुलिनची काम करण्याची प्रक्रिया संथ झाली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांपर्यंत १३ तास त्यांना निष्क्रिय बसवलं. पण चौथ्या दिवशी त्यांना ट्रेडमिलवर एक्सरसाइज करण्यास सांगितलं. पाचव्या दिवशी तपासणी केल्यावर त्यांच्या ब्लड शुगरमध्ये कोणताही फरक बघायला मिळाला नाही.
(Image Credit : elementsmassage.com)
रिसर्चचे लेखक प्राध्यापक डॉ. एडवर्ड कोयले म्हणाले की, या रिसर्चमधून हे समोर येतं की, जास्त वेळ शारीरिक हालचाल न केल्याने एक्सरसाइज केल्यावरही मेटाबॉलिक प्रक्रियेत सुधारणा होत नाही. आपल्या शरीरात अशा काही स्थिती तयार होतात, ज्या सामान्य मेटाबॉलिज्मचा प्रतिरोध करतात. तसेच यातून हे सुद्धा समोर येतं की, १०, १५ तास बसल्याने किेंवा एक्सरसाइज केल्याने मेटाबॉलिज्म वेगळ्याप्रकारे प्रभावित होऊ शकतो. म्हणजे दिवसभर निष्क्रिय बसणे कोणत्याही स्थितीत चांगलं नाहीये.