हाताला अधिक बोटे असलेले लोक सामान्य हातांच्या तुलनेत दैनंदिन कामे अधिक चांगल्याप्रकारे करू शकतात. हे आमचं नाही तर इम्पेरिअल कॉलेज लंडनच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. अभ्यासकांनुसार, अधिक बोटे त्यांना सहजपणे काम करण्यात मदत करतात. हीच खासियत पाहून भविष्यात रोबोटला सुद्धा ५ पेक्षा अधिक बोटे लावली जाऊ शकतात.
कामे पटापटा होतात
हा रिसर्च जर्मनीतील एका आई आणि तिच्या मुलावर तसेच स्वित्झर्लॅंडच्या लोकांवर करण्यात आला. दोघांचेही सहा बोटे होती. अभ्यासकांनी रिसर्चदरम्यान आढळलं की, हे लोक सहा बोटांच्या मदतीने अनेकप्रकारची कामे सहजपणे करू शकतात. जसे की, बुटांशी लेस बांधण्यासाठी एकच हात वापरतात.
७०० पैकी एकाला असतात सहा बोटे
हाताला पाचपेक्षा अधिक बोटे असणं ही जन्मजात समस्या असते. याला पॉलीडेक्टली असे म्हटले जाते. दर ७०० लोकांमध्ये एका व्यक्तीला सहा बोटे आढळतात. अधिकची बोटे सर्जरी करून काढली जाऊ शकतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, जर अतिरिक्त अंगठा किंवा बोट क्रियाशील असेल तर ते सर्जरी करून काढू नये.
(Image Credit : dailymail.co.uk)
अतिरिक्त बोटांची असते खासियत
रिसर्चचा उद्देश हे जाणून घेणं होता की, अतिरिक्त बोटे समस्या वाढवतात का आणि याचा मेंदूवर वाईट प्रभाव पडतो का? यात अभ्यासकांना असं आढळलं की, हळूहळू मेंदू ही गोष्ट स्विकारतो. तसेच असंही आढळलं की, या अतिरिक्त बोटांमध्ये काहीना काही खास काम करण्याची अधिक क्षमता असते. जसे की, शूटची लेस बांधणे, पुस्तकाची पाने पलटवणे, अधिक बटन असलेल्या रिमोटने व्हिडीओे गेम खेळणे.
इम्पेरिअल कॉलेजचे प्राध्यापक एटीन बर्डेट यांना हा रिसर्च प्रामुख्याने जर्मनी आणि स्वित्झर्लॅंडमध्ये केला. प्रा. एटीन म्हणाले की, अतिरिक्त बोटे ही जन्मजात कमतरता मानली जाते. कुणी कधी हा विचार नव्हता केला की, ही बोटे कामातही पडतात.