HabitThat Make you Look Old : एका वयानंतर चेहऱ्यावर वाढलेलं वय दिसू लागतं. पण काही लोकांच्या चेहऱ्यावर कमी वयातच म्हातारपण दिसू लागतं. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण हे सगळं तुमच्या सवयींमुळे होत आहे. अशात तुमच्या काही सवयींकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. यासाठी तुमच्या लाइफस्टाईलमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. चला जाणून घेऊ कोणत्या सवयी बदलाव्या.
सतत तणावात राहणं
आजकाल जास्तीत जास्त लोक तणावात राहतात. पण नेहमीच तणावात राहिल्याने तुमच्या शरीरावरही याचा प्रभाव पडतो. सध्या सगळे लोक वेगवेगळ्या कारणांनी तणावात आहेत. पण तणाव एका लेव्हलपर्यंत ठिक असतो. तो वाढला की, त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. अशात तणाव कमीच घ्या.
पुरेशी झोप घ्या
आजकाल जास्तीत जास्त लोक रात्री उशीरापर्यंत जागी राहतात. ज्यामुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण जर पुरेशी झोप घेतली नाही तर तुमच्या त्वचेवर याचा वाईट प्रभाव पडतो. झोप कमी झाली तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे नेहमीच पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे. रोज 7 ते 8 तास झोप घ्यावी.
हेल्दी आहार घ्या
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांचं खाणं-पिणं बिघडलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, याचा तुमच्या त्वचेवर प्रभाव पडतो. जास्त तळलेले आणि मसालेदर पदार्थ खाल्ल्याने एजिंगची समस्याही होऊ शकते. अशात जर तुम्ही जर कमी वयातच जास्त म्हातारे दिसत असाल तर हेल्दी डाएट घ्या आणि वेळेवर जेवण करा.
स्मोकिंगची सवय
जर तुम्हाला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे त्वचेला पुरेसं पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही. अशात तुम्हाला जर स्मोकिंगची सवय असेल तर वेळीच सोडा आणि निरोगी रहा.