These Foods Make You Old Before Age: हा प्रश्न सर्वांच्याच मनात येतो की, अखेर वाढतं वय कसं रोखलं जाऊ शकतं? पण वय वाढणं ही प्रक्रिया तर नैसर्गिक आहे. तरीही वाढतं वय रोखण्यासाठी लोक वेगवेगळे एक्सपरिमेंट्स करतात. आपल्या त्वचेवर आणि वयावर डाएट व लाइफस्टाईलचा अधिक प्रभाव पडतो. डाएट आपल्या एजिंग प्रोसेस कमी करू शकते आणि वाढवूही शकते. अशात तुम्ही आहारातून असे काही पदार्थ गायब केले पाहिजे जे तुम्हाला कमी वयातच वृद्ध बनवतात.
गोड पदार्थ
गोड पदार्थ आपल्या शरीरासाठी फार नुकसान पोहोचवतात. गोड पदार्थांमध्ये शुगर, रिफाइंड फ्लो इत्यादी पदार्थ असतात जे आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी चांगले नसतात. जर तुम्हीही गोड पदार्थांचं सेवन करत असाल तर तुमची एजिंग प्रोसेस बरीच जास्त वाढते. अशात तुम्ही कमी वयातच वृद्ध दिसू लागता. त्यामुळे जर तुम्हीही खूप जास्त गोड पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा. जर तुम्ही गोड पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर तुमच्या डोळ्याखाली सुरकुत्या येऊ लागतात आणि त्यामुळे तुमचा चेहरा अधिक वृद्ध दिसू लागतो.
तिखट पदार्थ
प्रमाणापेक्षा जास्त तिखट पदार्थ कुणी खात असेल तर याने त्वचा आणि आरोग्याचं नुकसान होतं. इतकंच नाही तर जास्त तिखट खाल्ल्याने एजिंग प्रोसेसही वेगाने होते. याचं कारण तिखट पदार्थामुळे शरीरात उष्णता वाढते आणि शरीर स्वत:ला थंड करण्यासाठी जास्त एनर्जी घेतं. अशात घाम त्वचेवरील बॅक्टेरियासोबत मिळून त्वचेवर समस्या निर्माण करतं. ज्यामुळे तुमची त्वचा कमी वयातच वृद्ध दिसू लागते.
सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स
सोडा आणि एनर्जी ड्रिंक्सची तुमचं वय वाढवण्याचं काम करतात. याचं कारण यात कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये जास्त शुगर असते. त्यामुळे हे नुकसानकारक असतात.